Monday, June 04, 2007

कॉफी

तुला आठवतंय, तू माझ्या डीपार्टमेंटच्या बाजूने जायचास मला दिसशील अशा हेतूने, अगदी शक्य तितक्या सावकाश आणि वेळ काढत. माझं लक्ष नसताना तुझा किती हिरमोड झाला असेल माहीत नाही. पण माझं अचानक लक्ष गेल्यावर तुझ्या ओठतलं हसू पटकन सांडायचं आणि माझ्या शेजारच्या त्या ढापण्या काकू टायपिंग सोडून माझ्याकडेच बघायच्या. पण तोपर्यंत मलाही हसू आवरता यायचं नाही आणि केव्हा एकद कॉफी मशिनकडे येतेय असं व्हायचं. सोबत बॉस असेल तर मग अवघडच. त्यांनाही दिसत असेल का रे माझं हसू? असू दे मेलं.
मग त्या मशिनजवळ पोचताना दोन-दोन पायऱ्या चढत यायचे. :-) आता ती कॉफी कशी होती माहीत नाही पण अख्ख्या जगाला आपल्याबद्दल माहीत असूनही नॉर्मल होऊन बोलणं अवघडच होतं नाही का? ते एकमेकांसारखे दिसणारे दोन कारकून, तुझे साहेब, तर कधी तुझ्याच डीपार्टमेंटचा एखादा वर्कर, सगळे फक्त 'काय साहेब?' म्हणून जायचे. त्यांचं ते मिश्कील हसू पाहून पळून जावंसं वाटायचं,but who cared? :-)ते कॉफीमशिन म्हणे महिन्या-दोन महिन्यात कधीतरी साफ करायचे म्हणे. कुणीतरी एकदा एक माशी तोंडात आली हे ही सांगितलेलं. But who cared? :-) माझ्या कंपनीतल्या शेवटच्या दिवशी आपण ५.३० ला तिथे भेटलो होतो, मला आठवतंय चांगलं. चार लोकांत अवघडलेपण आलेलं आणि एकटं भेटल्यावर केव्हा एकदा मिठीत येऊन रडेन असं झालेलं. हम्म्म्म्म्म...चार-पाच वर्षं झाली त्याला. होय ना?......
तुला इथली कॉफी आवडते का रे? फार कडू असते, अगदी उलटी येईल इतकी कडू. दुपारी नाईलाज म्हणून किंवा सकाळी भुकेवर एक उपाय म्हणून घेते मी कधीतरी. तुला आवडली असती का रे अशी कडू कॉफी? माहीत नाही. :-( आज-काल तसं तुझ्याबद्दल काहीच माहीत नसतं मला म्हणा. असो. तर ही कॉफी ना, इतकी कडू असते. मग मी त्यात दूध ओतते बरचसं, पण तेही मेलं पातळ पाणी. तरीही ओततेच.कितीही प्रयत्न केले तरी रंग काही सुधारत नाही त्याचा. मग बाकी लोक एखादं पाकीट साखर घालत असतील तर मी ४-५ घालते. पण तरीही कडूच. :-( असो. सगळ्य़ाच गोष्टी हव्या तशा थोडीच मिळतात, फक्त कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न करता येतो इतकंच.
-विद्या.

12 comments:

कोहम said...

chaan....avatala....shevatacha vakya khaas

Anonymous said...

You could have done much better.

Vidya Bhutkar said...

Thanks Kohaam(Nilesh?) for your comment.
@Anonymous, would you like to explain your comment a bit? I would like to know abt the improvements for sure.

-Vidya

Anonymous said...

I have read some of your older posts those are really good. This one is also good but I feel there should have been a bit more content to the story, also you haven't really told, why you left the 'coffee' u loved, and you complain about 'coffee' you are getting now.. ;)
That's all, I liked the story but it is nothing compared to your 'Alter Ctrl Delete'..(plz don't mind, couldn't help myself from comparing)

Vidya Bhutkar said...

Thanks very much ananymous for your frank comment.And esp for keen observation.:-)
Should I say anything after this? But it'll look like an excuse/explanation. But I cant stop myself from writing it. :-)

ही कथा म्हणून न लिहीता केवळ विचार मांडले आहेत आणि मला जसे विचार डोक्यात आले तशी लिहित गेले त्यामुळे ते विस्कळीत वाटत असावेत.

-Vidya.

Nandan said...

फक्त कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न करता येतो इतकंच - apratim.

Anonymous said...

surekh lihlay....you have conveyed
a lot through less words !

Monsieur K said...

it is indeed very difficult to forget the old coffee u love.
the new one that takes its place does seem bitter - no amount of milk and sugar can make it better coz wot u really seek is the aroma and the taste of the old.

coincidentally, i was just showing the coffee room to a new person who came in from india y'day. being addicted to nescafe, i was telling him how bitter and lousy american coffee is; to admit that now, i have learnt to make do with it.

on another note, if your office cafeteria has the starbucks' machine vended "french vanilla" - try it. i absolutely love it!
am gonna miss it when i go home to india this month to my good ol' nescafe :D

Meghana Bhuskute said...

कडवटपणा कमी करायचा प्रयत्न करावाच लागतो, ना? ’आम्ही दु:खी’ म्हणून रडत बसायचापण वैताग येतोच!
"फक्त कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न करता येतो इतकंच."
खरंय, अगदी खरंय...

Anonymous said...

Many times it happens

What we want we rarely get and then the circle of thoughts goes on

Oh if I would have done this, why I did that ……

I was searching, is there any one who also thinks the same way

Your coffee is actually sweet because it is short and I think this is the best story of yours as it is less descriptive as it allows others to imagine in their own way, which makes this as your story as well as mine

~hem

Vidya Bhutkar said...

नंदन, मेघना, केतन, Anonymous, हेम...कमेंटसबद्दल..थॅंक्स आणि माझ्या कमी शब्दांतून खूप काही कळवून घेतल्याबद्दलही. :-)
@केतन, मी "french vanilla" ट्राय करेन.

-विद्या.

Anonymous said...

chaan...........khup mast