Tuesday, December 12, 2006

त्रिशंकू!!!

कॉफी मशीनजवळ चार टवाळांचा खिदळण्याचा आवाज आला आणि तो वैतागला. मनातल्या-मनात एक दोन शिव्या घालून त्याने आपल्या कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. "साले एक तर उशिरा ऑफिसला येतात आणि त्यानंतरही असाच टाईमपास करत राहतात. कधी वेळेवर काम करायची बोंब." तसे त्याला त्यांच्यावर चिडायचे काही कारण नव्हते, तेही त्याच्याच देशातले, त्याच्यासारखेच नोकरीसाठी इथे राहिलेले. शिवाय त्यांनी आजपर्यंत कामात कुठेही चूक केली नव्हती. त्यामुळे त्याला फारसे बोलताही यायचे नाही.फरक फक्त एवढाच होता की तो आता जवळ-जवळ अमेरिकनच झाला होता तो काम करत असलेल्या कंपनी सारखाच. आणि या खिदळणाऱ्या, एका भारतीय कंपनीकडून आलेल्या लोकांचा तो साहेब झाला होता.तिकडून हसण्याचा आवाज वाढतच होता. शेवटी त्याने संगणकाला कुलूप लावून खिडकी समोर येऊन उभा राहिला. त्याची ती आवडती जागा होती. त्या खिडकीतून बाहेर पाहत त्याने कितीतरी गोष्टींवर विचार केला होता. पण आज त्या खिडकीतूनही फक्त सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होते. प्रत्येक वस्तूवर एक प्रकारचा थंडपणा आला होता.इथली थंडी त्याला बऱ्याच जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायची. त्या दिवसांची जेव्हा तो नुकताच इथे आला होता....
पुण्या-मुंबईच्या एका मध्यमवर्गातील घरातून तो आलेला. बारावी, अभियांत्रिकी शिक्षण सारे अगदी नेहमीसारखे.त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचा निर्णय घेतला. आई-बाबांची आयुष्यभराची पुंजी खर्चून तो अमेरिकेत पोचला.मग अभ्यास,रात्रीची नोकरी, इथली थंडी, परीक्षा यांना तोंड देत त्याने डिग्री मिळवली. हे सगळं होईपर्यंत तरी तो तसाच होता, खेळकर, अभ्यासू, मनमिळाऊ, घराची, आपल्या देशाची ओढ असलेला एक भारतीय. शिकताना, पैसे पुरेसे नसले तरी मिळेल त्या वेळात, पैशात मित्रांबरोबर मजा करणे, घरच्यांशी बोलणे या सगळ्या गोष्टी तो करत असे. अगदी इथल्या लोकांवर, इथल्या व्यवस्थेवर, आसपासच्या गमतीजमती वर गप्पा मारणे, हसणे-खिदळणे हे ही करत असे. लवकरच डिग्री मिळाली आणि नोकरीची शोधाशोध सुरू झाली.आपल्या वक्तृत्व कौशल्यामुळे,चांगल्या मार्कांमुळे नोकरीही मिळून गेली. पैसे काही खूप जास्त नव्हते पण कर्ज फेडणे आवश्यक होते. एक-दोन वर्षात कर्जही फेडून टाकले त्याने. आई-बाबांची मान गर्वाने उंच झाली होती. पण हळूहळू त्याच्यातील बदल त्यांनाही जाणवत होता.

तो बराच एकटा एकटा राहत होता.अमेरिकन कंपनीमधल्या परक्या लोकांबरोबर जुळवून घेणे त्याला अवघड जात असले तरी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मिळून-मिसळून राहणे त्याला भाग होते.शिवाय आपल्या वेगळेपणाचा, बावळटपणाचा कुणी हशा उडवू नये यासाठी तो जास्तीत जास्त प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्याच्या बोलण्याच्या ढंगात, वागण्यात, एक प्रकारची व्यावसायिकता आली होती.त्याचे मित्र आपलल्या कामात गुंग झाले होते. तो ही आपल्या आयुष्यात रमून गेला. पैशाची नशा दारूच्या एकदम उलट असते. आधी गरज म्हणून नंतर गंमत म्हणून पैशाची ओढ लागते, तशी ती त्यालाही लागली. लवकरच त्याला भारतातल्या व्यवस्थेचा, तिथल्या लोकांच्या वागणुकीचाही राग येऊ लागला. प्रदूषण, उष्ण वातावरण, गर्दी यात त्याचे मन रमेनासे झाले आणि त्याने कायमचे अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला!!!
आता आई-बाबांनी त्याला त्याच्या पसंतीने मुलगी बघून दिली आणि त्यांचे लग्न लागले......आरती....!बापरे!! तिला फोन करायचा होता! एकदम भूतकाळातून बाहेर येत त्याने तिला फोन लावला.
आरती, "अरे काय तू, जेवायला येणार आहेस की नाही घरी?"
त्याने वैतागून उत्तर दिले,'नाही गं,किती वेळा सांगितले मला वेळ नाहीये म्हणून? "
ती, "डबा तरी न्यायचा होतास."
तो अजून चिडला,"सांगितले ना मला नाही आवडत ते भाजी-पोळी डब्यात न्यायला."

तिने रागाने फोन ठेवून दिला. त्यानेही मग फारसे लक्ष न देता कामाकडे मोर्चा वळवला.दुपारी त्याच्या ऑफिसमधली बाकीची मंडळी आपापले डबे घेऊन जेवायला जाताना दिसली.कधीकधी त्याला त्यांचा हेवा वाटत असे.त्याला ती एकत्र डबे खाण्यातली गंमत आठवली. :-) पण त्याच्या बॉस बरोबर जाताना डबा घेऊन जाणे त्याला आवडत नसे. त्या लोकांना मात्र या माणसाची फार कमाल वाटत असे. सुरुवातीला भारतीय असल्याने त्याच्याशी बोलण्याच्या, ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने तो अगदी धुडकावला होता. मग त्याचा नाद सोडून दिला त्यांनी.एक जण बोलत होता,"हा काय फार स्वतः:ला शहाणा समजतो काय रे? एकदा बघितला पाहिजे मीटिंगअध्ये त्याला." दुसरा, "हो ना,अमेरिकन कुठला!" तिसरा," ते जाऊ दे.अरे या शनिवारी डाऊनटाऊन मध्ये महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम आहे, जायचंय का बोला?" सगळे, " हो!!!" तर असं भारताबाहेरही त्याचं ते भारतीय मन आपलेपण शोधत होतं.'त्या'ला मात्र त्यांचं अव्यवस्थित राहणं अजिबात आवडायचं नाही. मोठ्याने बोलणे, हसणे, अकारण सलगी दाखवणे, त्यांचा बोलण्याचा हेल, सगळं कसं लाजिरवाणं वाटायचं. असो.
आजचा सगळा दिवसच कंटाळवाणा होता. त्याच-त्याच जुन्या आठवणी, नको असलेले विषय आणि वैताग आणणारे लोक, या सर्वांनी हैराण केलं होतं. त्यात अचानक एक मीटिंग बोलवली होती त्याच्या बॉसने, जॉनने. सगळी मंडळी एकत्र जमल्यावर कळले की प्रोजेक्ट संपत आल्याने बरेच लोक भारतात परत चालले आहेत. त्यांच्यासाठी एक पार्टी ठेवायचं बॉसच्या मनात आहे. आता हे काय? पार्टी कशासाठी? तिथं गेल्यावर या लोकांबरोवर बसायचं, बोलायचं, खोटं-खोटं हसायचं. :-(( त्याला नको होतं हे सर्व. त्याने टाळण्याचा प्रयत्न केला पण साहेबांची आज्ञा असल्याने गप्प बसावं लागलं. दोन दिवसांनी पार्टी होती एका अमेरिकन रेस्तराँमध्ये.

एक-एक करून सर्व लोक जमले. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर गप्पा सुरू झाल्या. प्रत्यकेजण घरी गेल्यावर काय करणार याबद्दल जॊन विचारत होता. कुणाला लग्न ठरवायचे होते, तर कुणाला घरी निवांतपणे पडून घरच्यांशी गप्पा मारायच्या होत्या. पण चांगली गोष्ट होती की दिवाळी तोंडावर आली असल्याने तेव्हा घरी राहायला मिळणार म्हणूनही आनंद होता.जॉनने मग दिवाळी काय असते ते विचारले. सर्वांनी उत्साहाने बोलायला सुरुबात केली. तो गप्पच बसला होता. कित्येक वर्षात त्याने दिवाळी साजरी केली नव्हती. जॉनने एकदम त्याला विचारले, "बाय द वे, व्हाय डोंच्यू सेलिब्रेट दिवाली?". त्याच्याकडे काही उत्तर नव्हते.तो कसंसं हसला.

जेवायला घेताना कळले की बर्याचसे पदार्थ मांसाहारी होते,त्यातही गायीचे/डुकराचे मांस जास्त.मग प्रत्येकाने आपापली ताटली स्यलडकडे वळवली.ते पाहून जॉन त्याच्याकडे पाहत म्हणाला, 'ओह, आय अम व्हेरी सॉरी. आय डिड नोट नो मच अबाउट धिस.आय आलवेज सॉ हिम ह्यविंग इट'.खरंतर त्याने कुणी काही बोलायला नकॊ म्हणून कधी सांगितलेच नव्हते.आता मात्र सर्वांसमोर त्याला चोरट्यासारखे वाटत होते. हीच नाही अशा अनेक गोष्टी त्याने स्वतः:मध्ये बदलल्या होत्या. तो कॊणती एक सांगणार होता?

घरी जाणाऱ्या पैकी जवळपास सगळेच साधारण एक-दोन वर्षे इथे राहत होते.त्यांना आता घरी जाण्याची ओढ जाणवत होती. जॉन त्यांना म्हणत होता,"I can understand your feelings. I cannot stay away from my home or my folks for long. I miss them." घरी जाण्याची ओढ असलेले,मनाने अजूनही भारतीय असलेले ते साधे-सरळ लोक आणि एकीकडे त्यांच्या भावना समजून घेणारा जॉन यांच्यामध्ये तो एकटाच पडला होता. परत ये म्हणून-म्हणून थकलेले आई-बाबा, पूर्वी यांच्यासारखाच असलेला तो, त्याचे मित्र-मैत्रिणी, ते जुने दिवस आठवत, समोर आलेल्या मांसाहारी सूपमधले 'पोर्कचे' तुकडे बाजूला काढून खात असलेल्या त्याचा आज त्रिशंकू झाला होता!!

-विद्या.

Monday, November 20, 2006

Restlessness

When I was in eighth standard, I had one favourite fountain pen. I loved it so much, I used to write my homework promptly during those days. And some day, suddenly it wasnt there. I searched the whole house, my school bag, even my classroom.But I couldnt find it. :-(( It was gone. I went to the shop to buy a new one. But the new one didnt make me like it. I missed my pen a lot. Many a times, I used to feel restless and start searching in the house all over again.But I knew it was gone. That was one incident of my restlessness, frustration I always remember. And there were many more after that.....there have been so many things that I lost.
There is one more thing that make me restless, TIME. It make me feel frustrated for not able to go back and fix the things that I want to fix so badly. The decisions that were made in hurry or the ones which were too late. Have you ever been in a classroom that is really boring and you are stuck for another two hours? Doesnt that make you feel frustrated? The time doesnt move fast. And you feel like killing yourself for making that decision of sitting in the class. And there are some moments where you want to be there so badly and you are late. You feel like fixing it, but no, it doesnt work that way. If its gone, its gone.......
My friend used to tell me always that time doesnt come back but I never understood its real meaning.Now many a times I realise how true it is. Really, time doesnt come back. You can just think and feel sad,bad, restless and frustrated for not able to make it come back. So the only way you can make things better is going ahead and trying to make better decisions. And reduce the probability of getting into position to repent.
Well, if only it was so easy to look ahead all the time. I always go back....to the moments I missed and get the pain of Restlessness !!!

Monday, November 06, 2006

'वो' फिरसे आया था

एक कोशिश कर रही हूं मराठी में लिखी कविता का भाषांतर करने की:( I hope this helps)

'वो' फिरसे आया था,
मेरे विश्वास को तोडने
आ गया था मुझे अपने मन को समझाना
भूला दिया है मैने उसे
और सिख भी लिया था
गम भुलाकर ह्सना.
'वो' फिरसे आया था,
मुझे बताने क्या होता है खिलखिलाना.

भावनाओंके सारे दरवाजे मैने
बंद किये थे
होठों को भी बडे
तालें लगायें थे
'वो' फिरसे आया था,
वो सारे दरवाजे खोलने
ना खुले तो उन्हे तोडने.

उसके और मेरे सारे दोस्तोंसे
हम दूर जा चुके थे
नयी जगह, नये लोगोंसे
नाते जोड लिये थे.
'वो' फिरसे आया था,
पुरानी यांदे जगाने,
कौन कहा रहता है
ये मुझे ही पुछने.

लेकीन 'वो' आया और मैने जाना
क्या खोया था,
मन को कितना भी रोका
उसे तुम्हारे पास ही आना था.
खूब सारी बातें की है
और ढेर सारी यादें ताजा की है
मन के दरवाजे खोल
दिलमें रोशनी भर ली है.

तुम फ़िर जा रहे हो
मेरे लिये एक बडा काम छोडके
फ़िरसे बांध बांधने है
फिरसे ताले लगाने है
मनकॊ फ़िरसे समझाना है
जब तक ना समझे तब तक बताना है
की अब तुम्हे भूल जाना है
फ़िरसे.........तुम्हारे बिना मुझे जीना है.

-विद्या.

Friday, October 20, 2006

तो पुन्हा एकदा आला होता

तो पुन्हा एकदा आला होता
माझ्या विश्वासाला तडा द्यायला
पटलं होतं मला
मी केव्हाच विसरलंय त्याला
आणि शिकलेही होते मी
दु:ख लपवून हसायला
तो पुन्हा एकदा आला होता
हसणं आणि खुलण्यातला
फरक समजावयला.



भावनांचे सारे दरवाजे मी
बंद केले होते
ओठांनाही मोठे कुलुप लावले होते
तो पुन्हा एकदा आला होता
ते सारे दरवाजे उघडायला
नाहीच उघडले,
तरी थोड्या चिरा पाडायला.



त्याचे-माझे मित्र-मैत्रिणी
केव्हाच दूर गेले होते
अनोळखी लोकांशी नवीन
बंध जोडले होते
तो पुन्हा एकदा आला होता
जुन्या आठवणी काढायला
कोण आता कुठे असतो
हे मलाच विचारायला.

पण तो आला आणि कळलं
की काय हरवलं होतं
कितीही बांधलं तरी
मन तुझ्यामागेच धावत होतं
खूप बोलून घेतलंय, खूप हसून घेतलंय
सारे दरवाजे मोकळे करून
घर प्रकाशाने भरून घेतलंय.

तो आता निघून गेलाय
माझ्यासाठी मोठ्ठं काम सोडून
पुन्हा बांध बांधायचेत
आणि पुन्हा ओठ कसायचेत
मनाला समजून सांगायचंय
पटेपर्य़ंत बोलत राहायचंय
की मी त्याला विसरलेय
मी पुन्हा एकदा
त्याच्यावाचून जगायला शिकतेय.

-विद्या.

Wednesday, October 18, 2006

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी येतात
श्रावणातील सरींप्रमाणे,
फुलवून जातात माझ्या मनाला
कणाकणाने.......

-विद्या.

Thursday, October 12, 2006

ऊन-पावसाचा खेळ

रात्री शाळेत जायच्या चिंतेने झोपी जावं आणि सकाळी पऱ्याच्या राज्यात जागं व्हावं तसं वाटत होतं. सकाळी ९ वाजता(हो, कुणी उठवायला नसेल तर अजून उशीरा :-) ) मैत्रीणीचा फोन आला 'अगं बाहेर बघ Snow fall होतोय'. मी अविश्वासाने धडपडत उठले आणि पडदा उघडून पाहीले तर खरंच पांढरे कापसाचे कण भुरभुरत जमिनीवर येत होते. :-) It made my day ! ओक्टोबर मध्ये हिमवर्षाव? अवेळीच होता तो. कारण साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये कधीतरी पडणारा हा पाऊस एक महीना आधीच आला होता.असो. मी घाईघाईने आवरू लागले. १५-२० मिनीटानी मी पुन्हा एकदा बाहेर पाहीलं. गवतावर सफेद चादर पसरली होती. मी आनंदाने पाहत राहीले. आणि तेव्हाच, तेव्हाच कोवळ्या उन्हाची एक तिरीप माझ्य़ा बाल्कनीत दिसली. :-)) हिमकणांच्या त्या चादरीवर कोवळे ऊन फारच सुरेख दिसत होते. मी पटकन एक फोटो काढला.
ओफिसमधे जाणे गरजेचे होते. बाहेरच्या उन्हामुळे मलाही गाडी बाहेर काढायचा हुरूप आला. आवरून बाहेर पडले आणि वाटले रोज तळपणारा सूर्य थंडीत किती असहाय्य, असमर्थ वाटतो. गाडीवरचे बर्फ काढण्यासाठी काहीच नव्हते. मग कसातरी हातानेच तो बाजूला सारला. हिमवर्षाव थांबला होता आणि ऊन बिचारे बाकीच्या गाड्य़ांवरचा, गवतावरचा, रस्त्यावरचा बर्फ वितळवण्याचा प्रयत्न करत होते. मी गाडी काढली. एक-दोन सिग्नल आरामात गेले. अचानक ऊन गायब झाले होते. हिमकण जोरजोरात गाडीच्या काचेवर येऊ लागले. एकदम दूरचे दिसणे बंद झाले. पुढची पाच मिनीटे मी अंदाजेच जात होते. ३-४ सिग्नल गेले आणि परत ऊन पडले होते. हा खेळ अजून किती वेळ चालणार होता ऊन-पावसालाच माहीत. मी मात्र त्यांना पाहण्याचा आपला मूड आवरत ओफिसमध्ये पळत गेले. दिवसभर त्या दोघानी काय गोंधळ घातला तेही मला माहीत नाही. पण मी त्यांचा फायदा घेत, लवकर घरी निघून आले. :-)
(वरच्या चित्रात माझ्या बाल्कनीमधून काढलेला एक फोटॊ. गवतावरच्या बर्फावर पडलेले कोवळे ऊन ! )
-विद्या.

Wednesday, October 11, 2006

माझी चित्रकला- कला?

गेल्या ४-५ दिवसांपासून हे चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. आणि आज ते झालंय. :-) तसं पाहीलं तर बर्यापैकी जमलंय पण त्या पुस्तकात होतं तसं नाही. ते पहाताना माझ्या मनात विचार आला, 'मी चित्र काढलं म्हणजे काय तर पुस्तकात होतं ते पाहून माझ्या वहीत उतरवलं. याला कला म्हणता येईल का?' उत्तर होतं 'नाही'. ज्या माणसाने हे मूळ चित्र काढलं त्याला कला म्हणतात.मी एकदा प्रवास करत असताना माझ्या शेजारी एक माणूस बसला होता. तो जागेवर बसल्यावर ५ मिनीटात त्याने आपली वही काढली आणि काहीतरी रेखाटू लागला. त्याच्या हातात 'कला' होती. केवळ कल्पनेने/ आजूबाजूला पाहून काढलेली ती रेखाटने खूपच सुंदर होती.
मी काही पुस्तकेही आणली ज्यामध्ये काही टिप्स दिल्या आहेत, चेहरा काढण्यासाठी, स्थिरचित्रे काढण्यासाठी, इ. पण शेवटी ते पण नक्कल करणेच झाले ना? कधी विचार करायला लागले की फार नाराजी येते.मला माहीतेय की मी आता तरी अशी(काल्पनिक) चित्रे नाही काढू शकत, क. नुसते पुस्तकात पाहून तरी कितीदा काढणार?मला कळत नाहीये की मग करायचे तरी काय?
-विद्या.

Friday, October 06, 2006

तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही.....

Do I live in the past? Yeah, most of the times. Many people told me that :-) and I agreed. I decided to be in the present. Live the life as it comes and believe me I have been following it up for last few years. In last 2 years, I have moved to so many different places and lived with people I have hardly known. It was good. Visiting different places and enjoying the specialities of each of them. I had fun. Even now I am in here with bunch of people, I know for last 2 months. Its nice here. Its fun to be neighbour to someone, share the dishes, recipes and sometimes when you forget to buy salt, just knock the next door for a pinch of it. :-) Everything seems so fine.So what's exactly wrong? Thats what I was trying to think.
Every time I left one group of friends, I made bunch of others at new place. And they were all dear to me. There are friends with whom I have spent years and each day of those years. If we did not meet each other for a day, there used to be much to share. I remember when after each exam in college, we used to enjoy the vacation at home.But the phone bills used to be definitely more that month. And also remember the excitement of meeting each other after so many days. I miss that. I miss being so close to someone and sharing every small thing that happens in the day. I feel that those are the friends/people who know me, how I was and How I am.
When I see myself talking now a days, I feel its fake. Its all shallow. When I talk anyone, I ask 'How's life?'. And if anyone asks me that I say ' I am good'. Short and simple.That is why while listening to this song I realised...
तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही!
I havent met my old friends for years and may not have written a mail or called. I want to tell all those my friends that I miss them, I miss being with them and I miss laughing,enjoying,hanging out with them.I want to tell all of them that....
तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही.....
तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही.....जिंदगी नही......
-Vidya.

Thursday, September 28, 2006

परवलीचा शब्द- पासवर्ड

मी जेंव्हा http://www.manogat.com/ या साइट वर दाखल झाले, सर्वात पहिला शव्द मला आवडला तो म्हणजे, 'परवलीचा शब्द', म्हणजे 'पासवर्ड'. आजपर्य़ंत पासवर्ड या शब्दाचे मला कधी आकर्षण वाटले नाही पण 'परवलीचा शब्द' मला भावला. माझा आणि त्याचा स्नेह तसा जुना.६-७ वर्षांपूर्वी मी माझे पहिले खाते उघडले, याहू!! वर. तिथे लिहिलेला,वापरलेला पहिला परवलीचा शब्द. त्याकाळी( खूप जुनी गोष्ट सांगितल्या सारखे वाटते ना?), तर त्या काळी आम्ही अगदी प्रयोगशाळेत या टोकापासून त्या टोकापर्य़ंत ओरडायचो, 'अग या मशिनचा पासवर्ड काय आहे? '. कधी न सांगताच बदलायचोही, उगाच त्रास देण्यासाठी. :-) तेंव्हा त्याचं महत्त्व जाणवलंच नाही. तो खेळ खेळ नाही राहीला.दिवसेंदिवस या छोट्याशा शब्दाचे महत्त्व वाढतंच गेले. तुमचे बैंक खाते,वैयक्तिक पत्रव्यवहार खाते, कामाचे पत्र खाते, क्रेडिट कार्डचे खाते,अगदी इथे लिहिण्यासाठीचे पण खाते. :-) अशी महत्त्वाची माहिती असलेली खातई फक्त या परवलीच्या किल्लीने उघडतात. जेवढ्या सुविधा तेवढी मोठी यादी.
तर प्रत्येक नवीन खात्याबरोबर नवीन शब्दाचा शोध सुरु होतो.बरं सगळीकडेच एकच शब्द टाकावा तरी पंचाईत, आणि नाही टाकावा तर....??? डाबर च्यवनप्राश वापरा, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. :-)) माझ्या कार्यालयात, ७-८ दिवसांच्या सुट्टीनंतर लोक परत आल्यानंतर प्रशासकाच्या कामाचा व्याप वाढलेला असतो. कारण बरेच जण आपला पासवर्ड विसरलेले असतात. आता तुम्ही म्हणाल असा कसा विसरतात? पुन्हा एकदा ....च्यवनप्राश हेच उत्तर. :-) तर, मग काही लोक नवीन शब्द टाकतात तर काहींना जुना शब्द सापडून जातो. आता नवीन शब्द सुचणे तरी सोपे काम आहे का? काही साधा-सुधा असून चालत नाही.किती तरी नियम. ५-८ अक्शरी असावा,नुसते 'अबकड' टाका आणि पहा,तो संगणक नक्की रडेल. बरं त्याला हेही कळत की मागच्या वेळी तुम्ही हाच शब्द टाकला होता का.वैतागून कुणी जन्मतारीख टाकतो तर कुणी आपल्या प्रिय 'मैत्रिणीचे' उपनाम. ;-) कधी दुसरया-समोर टाइप करायची वेळ आली की मग गाल कसे लाल होतात पाहिलंय? शेवटी कसाबसा हा पासवर्ड चालून जातो आणि आपल्या खात्याचे कुलुप उघडते.
जरा कुठे हुश्श्य... होतंय तर संगणकाची सूचना येऊ लागते, थोड्या दिवसात आपला पासवर्ड मरणार आहे( एक्स्पायर होणार आहे) ,कृपया बदला.अहॊ माणसाच्या कल्पनाशक्तीला पण काही मर्यादा असतेच की !!पुन्हा एकद माझी आणि शब्दांची मारामारी सुरू होते. कधी वाटतं सर्व एका ठिकाणी लिहून ठेवावेत. तसं करणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीची किल्ली देणं आहे. बरोबर ना? वेगवेगळ्या ठिकाणी लिहावेत तर धोतराला बांधलेल्या गाठीसारखे. कुठली गाठ कशासाठी बांधली हेच आठवणार नाही. मी अजून एक विसरलेच होते, कायदे, पासवर्ड वापरण्याचे.मोठे मोठे घोटाळे झाले आहेत या छोट्याशा शब्दाने. कितीतरी लोक आपल्या नोकरीस मुकले असतील या पासवर्डचा चुकीचा उपयोग केल्याने. एखादा तीळ ७ जणांत वाटता येईल पण पासवर्ड नाही. अजून काय सांगनार मी बापडी या शब्दाबद्दल.त्याची मूर्ती लहान पण कीर्ति महान. मीच त्याच्या जाळ्यामधे अडकलेली छोटीशी माशी. जेव्हढे लिहीन ते थोडेच.
माझे हे पासवर्ड-पुराण मी इथेच थांबवते कारण तिकडे एक संगणक कुलुप लावून बसला आहे. त्याला उघडण्याचा प्रताप चालू आहे.आता तर असं वाटतंय की तो संगणक जोरजोरात हसतोय माझ्यावर. :-((... म्हणतोय, "आता सांग, काय करणार. नवीन शद्ब कसा शोधणार?"..... तसं माझं शब्दांशी काही वाकडं नाही हो, पण त्या संगणकाचे आहे ना. त्याला वाकडेच शब्द रुचतात. त्यामुळेच तर सुरू झाली माझी ही आजची कहाणी. :-)
-विद्या.

Tuesday, September 26, 2006

आरंभशूर??



होय, आरंभशूर! आजकाल मला वाटते मला जर दुसरे नाव देता आले तर ते म्हणजे आरंभशूर!आता या लिखाणाचीच गोष्ट घ्याना. मला लिहायला सुरुवात करून ५-६ दिवस झाले असतील. तुम्ही माझा पहिला ब्लोग वाचला असेल तर कळेल की मी किती उत्साही होते रोज काहीतरी लिहायला. मी पहिले २ दिवस तर धड स्वैपाक पण केला नाही. आणि आज मला वाटले खरेच लिहायची इच्छा आहे का? :-) आता उत्तर काय असेल याचा अंदाज आलाच असेल. असो. मी लिहायला सुरुवात केल्याने आजचा दिवस तरी मी माझा शब्द ठेवला आहे.
या माझ्या आजाराची कहाणी आजची नाही. याची सुरुवात खूप वर्षापूर्वी झालेली आहे. शाळेत असताना मी आईकडे हट्ट केला कई मला स्कोलरशिपची परीक्शा द्यायची आहे. आणि का तर, सर्व जण शाळा सुटल्या नंतर ज्यादा तासाला बसायचे. :-) फारतर आठवडा भर माझा अभ्यासाचा उत्साह टिकला असेल.नंतर बिचारी आई अभ्यास कर म्हणून मागे लागून दमली. त्यानंतर सायकल शिकताना पण असेच, शिकेपर्यंत पडुन-धड्पडून ,शाळा बुडवून शिकले. नंतर त्याचाही उत्साह राहिला नाही. अरे हो, carrom शिकतानाही वेगळी गोष्ट नव्हती. आई दादानी सर्व इच्छा कशा पूर्ण केल्या हे त्यांनाच माहीत.
माझा थोड्या दिवसांपूर्वीचा छंद म्हणजे चित्रकला. तसे मी ८-९ पेन्सिल स्केचेस काढली आणि बरीच चांगली आली.त्यासाठी मी नवीन वह्या,पेन्सिल, काही पुस्तके पण आणली. खरं सांगते ती काढताना मी खूप मन लावून काढली. प्रत्येकवेळी २ चित्रांमधे २ महीन्यांचे तरी अंतर असेल. हा ब्लोग सुरु झाल्यापासून तर सारे साहीत्य असेच पडून आहे. आज हे सर्व सांगताना मला अपराधी वाटत आहे आणि अजून एकदा अपूर्ण राहीलेल्या गोष्टी पूर्ण करण्याचा निश्चय करतेय. :-) आजच्यासाठी एवढेच. आणि हो..माझ्या चित्रकलेचा एक नमुना.... वरच्या चित्रात......!!

-विद्या.

Sunday, September 24, 2006

Moong-daal ka Halwa

Finally I made it. Yes, I did. I made moong ka halwa twice and it was great. :-) There is a great restuarant in Chicago 'Jhopadi' where you get nice Gujarati thali. Their moong ka halwa was the most tempting thing for me. So this halwa was on my mind for a while. Few days back, I finally got the recipe from google for the halwa and made it. It was lengthy process and very tiring. I was afraid but to my surprise, it came up well. :-) I stored it well and had it for next 3 days. :-))

Over the weekend, I tried it again. This time, it was perfect. :-) When you do something right first time, you feel happy. When you get it right second time, you feel confident. So am I feeling right now. :-)) This time, it wasnt even tiring. Quick and sweet. :-) I am going to enjoy it for another 2-3 days. Ha ha ha.... here is the one I tried..http://festivals.iloveindia.com/ganesh-chaturti/mong-halwa.html

Friday, September 22, 2006

गाणे रडवणारे

हिंदी गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य बनले आहेत( खर तर आताच नव्हे पहिल्यापासून आहेतच).जसे जसे आपण आयुष्याची एकेक पायरी चढतो, तसे तसे वेग-वेगळी गाणी आपल्या सोबत आठवण बनून राहतात.एखादे गाणे ऐकले की वाटते मी १०-१२ च्या परीक्शेचा अभ्यास करत आहे, तर कधी कोलेजच्या मैत्रिणींबरोबर, रुम वर पडून आहे.तर एकूण काय की प्रत्येकाचे आपले एक हसवणारे, रडवणारे,खुलवणारे, उदास करणारे, प्रेमात पडल्यावरचे असे गाणे असतेच.
परवाच कुठेतरी मी, मला रडवणारे गाणे पुन्हा एकदा ऎकले आणि वाटले काहीच फरक नाहिये. तोच आवाज, ते शब्द आणि तोच परिणाम.:-(( पण तरीही ते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.ते म्हणजे 'प्रेमरोग' या चित्रपटातील, लताजींच्या आवाजातील, पद्मिनी कोल्हापुरे वर दर्शविलेले गाणे.......'ये गलियां ये चौबारा' !!!
तसे पाहिले तर हे गाणे फार आनंदात असलेल्या एका मुलीवर आहे आणि तरीही मला रडू येतं. आता मला शिक्शणासाठी नंतर नोकरीसाठी बाहेर पडून ९-१० वर्षे झाली आणि घरातून बाहेर राह्ण्याची, एकटी राहण्याची सवयही झालीय. पण मी पहिल्यांदा जेंव्हा घर सोडलं, तेंव्हा मला जाणवला काही शब्दांचा अर्थ.
'देख तू ना हमे भुलाना, माना दूर हमें है जाना. मेरी अल्हड सी अटखेलियां सद पलकों मे बसाना'.
किती खरी!!
त्यानंतरची ४ वर्षे पट्कन गेली आणि पुन्हा एकदा ते गाणं आलं. कोलेजच्या शेवटच्या वर्षी, नोकरी मिळाल्याचा आनंद, नवीन जागी जाण्याची उत्सुकता तर होतेच. तरीही तिथून जाताना मात्र काही शब्द आठवत होते.
'कल भी सूरज निकलेगा, कल भी पंछी गायेंगे. सब तुझको दिखाई देंगे, पर हम ना नजर आयेंगे. '
नवीन ठिकाणी, जुन्या दिवसाची, त्या मित्र-मैत्रिणींची किती आठवण झाली काय सांगू? परत कधीतरी कोलेज वर गेल्यावर असं वाटलं....
'अब हम तो भये परदेसी, की तेरा यहा कोई नही.....' खरच कोणी आपलं नव्हतं.

असो. अजूनही कधीतरी एकटं असताना हे गाणं ऐकलं की अस्वस्थ होतं. असं हे माझं रडवणारं गाणं. तुमचंही आहे काय?

Thursday, September 21, 2006

Looooooooonnnnnng Drive

It was one of my fantasies that came true after coming to USA, a long drive trip to a beautiful place with friends. :-) And over a period of time, I had quite a few. Never the enthusiasm was less nor the excitement faded. All of them had a guide, a organiser,a financier and so some whiner. :-) But they were all successful. Yes with lots of snaps and good memories forever.I wasnt going to write about any specific trip.Cos its said that the journey is more beautiful than the destiny.
तर एका शुभ्र सकाळी किंवा सुखद संध्याकाळी ही ट्रीप सुरू होते. ३-४ दिवस, २ चालक(drivers) आणि १०००-१२०० मैल असे गणित असते. उत्साह ओसंडून वाह्त असतो. गाडीत बसल्या-बसल्या सामानाची यादी पडताळणी सुरु होते. मग मुलींची(हो अजूनही बायका आणि पुरुष असे उच्चार अंनवळ्णी पड्ले नाहीयेत माझ्या), तर मुलींची नवीन कपडे घेणे, packing करणे, घर आवरणे यात कशी घाई झाली याची चर्चा सुरू होते.आणि मुलांची, नविन गाडीचे कंट्रोल, आरसे सेट करणे व ऒफिसच्या राहीलेल्या कामांबद्द्ल. सारा उत्साह, सारे विषय आणि लोक पकडूनही एका तासात बोलणे संपून जाते. आता तुम्ही सोबत जाणारया मित्राला खूप दिवसांनी भेटत असाल किंवा तुम्ही plan बद्द्ल उत्सुक असाल तर अजून अर्धा तास पकडा.
मंड्ळी गाडीत एकदम 'set' होऊन जातात. highway ला लागल्याने चालक पण तालात आलेला असतो :-)गावातून बाहेर पडल्यावर मार्गदर्शकही निवांत बसतो. chips, cold-drinks,घरगुती खाद्य पदार्थ तोंडात पडायला लागतात. पोट पूजा पण झाली. अजून अर्धा तास गेला.गाणी !!कुणीतरी सांगते CD टाक रे एक. मग गाण्यांच्या नादात आपण पहिल्यांदा या सुखद प्रवासाच्या सुंदर रस्त्याकडे पाहू लागतो. आणि पुढचे स्वाभाविक पाउल म्हणजे झोपेची चाहूल.तुम्ही म्हणाल काय bore मारतेय. इथेच तर गोष्ट सुरु होते. :-)हो सारे लेखक असेच सांगतात.
तर इथे सुरु होते आपल्या मार्गदर्शकाची भूमिका. मागच्या मंडळींनी गुंडाळी केल्यावर तो पण पाय ताणून देतो, हात seat च्या वरून मागे टाकतो. दोन-चार वाक्ये बोलतो आणि गप्प बसतो.पुन्हा एकदा तो मैत्रि आणि झोपेच्या कात्रीत अडकलेला असतो.आजचा हा प्रताप त्या साठीच.३-४ तासांचा हा प्रवास न झोपता, बोलता-बोलता कसा करावा. गेले ते दिवस जेंव्हा तुम्ही प्रेमात तासंतास गप्पा मारायचा.आता कुठे उरला तो उत्साह.इथे अनेक experts असतानाही मी नवशिक्याने लिहायची हिम्मत करावी हा उध्धट्पणा न समजता मूर्खपणा समजून माफ करावा.
चला तर मग, ट्रिप ला माझ्याबरोबर, मार्गदर्शक...the navigator.(हिन्दी सिनेमाचा परिणाम :-) )

१. पहीली गोष्ट, गाणी :मागच्या लोकांनी 'in demand' म्हणून लावलेली गाणी तुम्हाला आणि चालकाला नको असली तर लगेच बदला. :-) आणि चालकाला हवी तर मध्यरात्री पण 'गायत्री मंत्र', जगजीत सिंग हवा तर लावून टाका.तुम्ही एकदम latest गाण्यांची CD नाहीतर 'evergreen' गाणी ऐकवून चालकास 'चकीत' करा. @-@
२.दर २०-२५ मिनिटांनी गाडीचा वेग, वेग-मर्यादा आणि अजून किती अंतर राहीले आहे याचे गणित पुन्ह: पुन्हा करून त्याबद्द्ल माहिती द्या. इथॆ Gas म्हणजे इंधनाचे दर बदलत राह्तात( चक्क कमी पण होतात). त्यामुळे Gas किती महागला, कुठ्ली गाडी किती इंधन पिते असा जिव्हाळ्याचा विषय बोलूनच घ्या. एकदा मी असेच म्हणाले की मला विमानतळावर गाडी घेउन जायचे आहे तर मला १० लोकानी १० रस्ते सांगितले. तेही मी 'mapquest' च्या साईट वर पाहाणार हे माहीत असूनही. तसेच तुम्ही पण एखादा कसा जवळचा (शौर्ट कट) होता पण मग toll कसा आणि traffic किती हे बोलून घ्या.
३. इथे रस्त्याच्या आजू-बाजूला ना घरे दिसतात ना लोक न होटेल. साधे गाय, म्हॆस,कुत्रे,मांजरे(गाडीमध्ये बसलेली सोडून),चिमणी पण दिसत नाहीत.फक्त गाड्या, पुढे-मागे,सगळीकडे. वाटतं एखाद्या संगणकीय खेळामधेच आहोत.आपल्यामागून पुढे जाण्यार्या प्रत्येक गाडीबद्दल comment मारून टाका. त्याला अडवता येत असेल तर उत्तमच, नाहीतर पुढे गेल्यावर पोलिसांनी पकडले म्हणजे कळेल असे म्हणणे आवश्यक आहे. गाड्यांची models तर बोलूच नका.Mercedes ना, काय सही आहे रे, interior, वाह ! आणि मघाशी गेली ती 'Audi' पाहिलीस का? २००६ चे model आहे. हो यामध्ये आणि २००५ च्या मधे headlight वेगळे आहेत. आता तुमचे headlight विझत असेना का?
आपल्या toyota,honda किंवा Nissan मधे बसून BMW,Lincoln आणि Merc चे कौतुक करावे तेवढे थोडेच.मग japanese आणि americamn गाड्या हा तर ओळ्खीचा विषय. तुमची ३०-४५ मिनिटे तरि सरली नाही यात तर पॆज आपली !
४.आता म्हणाल दोन अडिच तास अजून आहेतच. एकदा मागे वळून झोपेलेल्या लोकांकडे पण नजर टाकून घ्या.आता खरी परीक्शा आहे.आई,बाबा,भाऊ,बहीण, TV serials, आपला onsite manager,त्याची meeting मधली गम्मत,india मधल्या नवीन घडामोडी,deals2buy वरच्या नव्या deals,vacation plans,मुन्नाभाई, शाहरूख खान, आबु सालेम, आणि जो तोंडाला येईल तो विषय काढा. आता मात्र हद्द झाली आहे.सर्व सहनशक्ती संपलेली आहे.झोप अनावर झालीय आणि गाडी पण. गाडी exit ला थांबवून मस्तपॆकी coffee latte प्या. मागच्यांना जोरात हाक मारून उठवा :-) आणि जोरदार ताणून द्या. :-).........
सकाळी ६ वाजता, हलक्याश्या थंडीत, वळणदार रस्त्यांमधून वाट काढ्त,Los Angelis सारख्या सुंदर शहरात, हिरव्यागार झाडीतुन येणारया कोवळ्या किरणांमधून, अर्धवट डोळे उघडून पहा किती छान वाटतं ते. तुमचा सुखद प्रवास संपलाय,नाही हो, जरासा थांबलाय...घरी परत जाईपर्यंत. :-)) Enjoy !!!
- विद्या.

Wednesday, September 20, 2006

माझा पहिला ब्लॉग

तुम्ही कधी ३ महिने त्रिवेन्द्र्म मधे राहिला आहात काय? तेही TCS च्या Induction Programme साठी? आणि मग कधि परत आल्यानंतर खायला बसलाय एखाद्या साध्या होटेल मधेही?पंजाबी,मराठी,गुजराती,चायनीज,इति...सारं कसं पोटात गर्दी करतं.तसंच झालंय माझं.तर जेव्हा मी http://marathiblogs.net या साईटवर आले आणि एकेक करुन सारे लेख वाचु लागले, मला असं वाटलं, काय खावू, म्हणजे काय वाचू आणि काय नको.मराठी मधे इतके सारे लिखाण वाचून ५-६ वर्षापासून एखाद्या इंग्रजी बेटावरून घरी परत आल्यासारखं वाटलं. :)बरं.. नमनालाच घडाभर तेल नको.
तर आज हा माझा पहीला ब्लॉग!!आता जरा टाईप करायला वेळ लागत आहे पण लवकरच सवय होईल.कुठून सुरूवात करावी कळत नाहिये. खूप दिवसांची माझी डायरी लिहीण्याची इच्छ्या पूर्ण होणार आहे म्हणून आनंद झालाय.रोज घडणारया छोट्या छोट्या गोष्टी पाहील्या की मनात विचार येतात आणि शब्दात उतरण्याच्या आधीच विरून जातात. पण आता नाही. :-) आज सारे डोक्यात गर्दी करत आहेत बाहेर पडण्यासाठी.ते सारे सांगणे तरी शक्य नाही पण मला आशा भोसलेनी गायलेले गाणे आठवत आहे.ते म्हणजे....."माझिया मना..."

कवि: सॊमित्र
गायिका: आशा भोसले
संगीतकार: श्रीधर फडके

माझिया मना...

माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना

माझिया मना, जरा बोल ना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना

माझिया मना, जरा ऐक ना
सांजवेळ ही, तुझे चालणेरात्र ही सुनी,
तुझे बोलणे उषःकाल आहे नवी कल्पना

आजच्यासाठी एवढेच.पुन्हा भेटू....लवकरच !!
:-)