Tuesday, July 10, 2007

माझं तुझ्यावर प्रेम आहेच...पण....

            तू जाणार हे फायनल झालं तर. म्हणजे तू सगळ्यात पहिल्यांदा मलाच सांगितलं होतं आणि सांगायलाही हवं होतंच. शेवटी, आपण दोघे गेले वर्षभर एकाच प्रोजेक्टमध्ये राहिलो होतो आणि आनंदाने राहिलो होतो. आता तू असल्यावर मी काम कसली करतेय. :-) त्यामुळे माझं आरामातंच चाललं होतं. पण तुला जाणं गरजेचं होतं. महत्वाकांक्षा, करियरसारख्या गोष्टी होत्याच की विचार करायला. मग हो नाही करत, आज-उद्या करत शेवटचा दिवस आला. शुक्रवारी माझ्याकडेच सर्व वस्तू दिल्यास परत करायला. आणि हो, तू सर्वांचा निरोप घेत असतानाही मी सोबतच होते. मला फार कसंतरी वाटत होतं. वाटलं, रोज शेजारी बसायचो, जेवायला-बोलायला सोबत, अगदी त्या बोअरींग मिटींगमध्ये पण सोबत असायचो. वाटलं दिवसभर तुझ्याशिवाय रहायचं. आणि प्रत्येकजण तुला 'बाय' म्हणताना जणू मलाच एक प्रश्न विचारत होता नजरेनं की 'तुझं कसं होणार?'. मी अगदी मोठ्या तोंडाने सांगितलं की तुझ्या जागी येईल कुणीतरी लवकरच... पण 'तुझी जागा घेणं'?..... अवघड होतं.......आपण संध्याकाळी भेटूच हे माहीत असूनसुद्धा...सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटायचं नाही....?
         सोमवार उजाडल्यावर डोक्यात पहिला विचार तोच आला. आज एकटंच ऑफिसला जायचं. सोमवार तसा नेहमीप्रमाणे कंटाळवाणाच होता. पण अगदी आकाश भरून वगैरे काही आलं नव्हतं.चक्क लखलखीत उन पडलं होतं. हवं तसं निवांत आवरून बाहेर पडले. कधीतरी स्वत:साठीच आवरून खूष होण्यातही मजा असते नाही? :-) वाटलं गाडीत बसून एकटंच जाताना तरी थोडं वाईट वाटेल. उलट आज आवडत्या जुन्या गाण्य़ांची सिडी उत्साहाने लावलई. तसा तुला मी कुठलीही गाणी लावली तरी फारसा फरक नाही पडायचा. पण आज एकटंच गाणी ऎकत जाण्यात वेगळंच सुख होतं. अगदी 'आपकी याद आती रही रातभर.....' गाणं ऎकतानाही गाण्याकडेच लक्ष होतं.
          ऑफिसमध्ये गेल्यावर तुझ्या खुर्चीकडे नजर टाकायलाही उसंत मिळाली नाही की कामाचा भडीमार झाला. आधी वाटलं होतं की तू नाहीस म्हटल्यावर सगळी जबाबदारी माझ्यावरच...:-( काही चुकलं तर? पण अंगावर पडल्यावर माणूस आपोआप काम करतोच. मग उलट जरा बरंच वाटलं की चला ब़ऱ्याच दिवसांनी स्वत:चं डोकं लावलं कुठेतरी. त्यानंतर मग जरा गूगलवर गप्पा आणि मेल,इ. मी आधीही हे करायचेच, मी असं नाही म्हणणार की तू चौकीदारी करत असायचास. स्वत: जरा काम केल्यावर थोडा टाईमपास करायला बरं वाटतं होतं. I deserved it. :-) तुला माहीतेय, मला गूगलवर,मेलवरही सगळ्यांनी हाच प्रश्न विचारला,'कसं वाटतंय मग तुला आज? तो नाहीये तर एकटं वाटत असेल ना?'. त्यांना कसं सांगणार की मी काही अगदीच दु:खात नाहीये. लोकांना जे अपेक्षित होतं तेच उत्तर दिलं मी. काय करणार ना?
         दुपारच्या जेवणासाठीही बदल म्हणून दुसऱ्या लोकांसोबत, दुसऱ्या विषयांवर बोलणं चांगलं वाटत होतं. जेवणानंतरचं आईसक्रिम खाताना जाणवलं की हे दुखं: वगैरे सगळं विसरायला होतं बघ...मला खायला दिलं की. :-)) गंमत म्हणजे ती मुलगी आहे ना, जिच्याशी माझं फारसं बोलणं होतं नाही बघ?आज तीही चक्क माझ्याशी बोलायला आली होती. तिने तुझ्याबद्दल विचारलं, मग जाता जाता म्हणालीही,' कधी कंटाळा आला तर ये माझ्याकडे गप्पा मारायला'.आपण लोकांबद्दल कसे ग्रह बनवून ठेवतो ना? आणि ते असे मोडले जातात, नकळतपणे. मला बरं वाटलं. त्यानंतर उरलेला दिवस पटकन निघून गेला.संध्याकाळी शेवटच्या अर्ध्यातासात मात्र मला राहवलं गेलं नाही. मी पटापट आपलं दुकान(संगणक) बंद करून बाहेर पडले. ट्रॅफिकमधून गर्दीतून माझी वाट काढताना' तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मै' चा इफेक्ट (नेहमीप्रमाणेच) जाणवल्याशिवाय राहिला नाही.
          तुला दिवसभरानंतर पाहिल्यावर मला परत एकदा प्रेमात पडावसं वाटलं. :-) तुझा पहिला दिवस कसा गेला वगैरे ठीक आहे रे. पण मला मात्र विचारु नकोस. बाकीच्यांना खोटं सांगायला काही प्रॉब्लेम नाहीये. तुला खरं सांगितल्याशिवाय राहवणार नाही. सांगू? खरं सांगू? .....माझं तुझ्यावर प्रेम आहेच रे...पण....माझं माझ्यावरही खूप प्रेम आहे. :-) आणि एकांतात ते वाढतंच जातं. :-).....

-विद्या.

18 comments:

Abhi J said...

U just rock Vidya.
Ur blog touches heart in such way that makes u feel the intensity of ur feelings in both way, inspirationally as well as intuitively.

Keep it up.

Abhi J

Anand Sarolkar said...

Ekdum jabari!
kharach dusryavar prem kartana pan apan swatahvarsudhha prem karatch asto.

He sagla kihiyla kasa suchta tula?

simply gr8!!!

Anonymous said...

शब्दांचं आणि माझं फारसं सख्य नाही, कारण मला जेव्हा आसुसून व्यक्त व्हायचं असतं तेव्हा ते भूमिगत झाल्यासारखे कुठे तरी दडी मारून बसतात. व्यक्त होण्याची खुमखुमी ओसरल्यावर मात्र छद्‍मी वाकुल्या दाखवत येतात. त्यामुळेच असा शब्दांचा निर्झर पाहिल्यावर फार अप्रूप वाटतं. शब्दांच्या माध्यमातून मनाच्या आरश्यातली प्रतिबिंबं कशी लख्ख दाखवली आहेत प्रस्तुत लघुकथे मध्ये! नकळत वाचक स्वत:ला कथेच्या पात्रांमध्ये आयडेंटीफाय करायला लागतो. हेच कथेचं यश!

प्रस्तुत लघुकथेच्या सौष्ठवाचा केंद्रबिंदू मला शीर्षकाच्या "पण" मध्ये जाणवला. द्वैताच्या तराजूमध्ये हे "पण"चं पारडं नेहमीच अंमळ जड असतं नाही? :-)

शब्दमल्हार असाच बरसत राहू दे ही सदिच्छा.
आनंद दिल्याबद्दल धन्यवाद! :-)

स्वाती आंबोळे said...

विद्या, 'पण..' मस्त. :)

स्वाती आंबोळे said...
This comment has been removed by the author.
Meghana Bhuskute said...

too good. kay lihaw kalat nahi. kharach apal apalyawar prem asat khup. ani te barach ahe... that's 'eros' i guess.... right?
Please keep writing... (dewnagarit lihaycha aalas kelyamule korad lihilyasarakh watatay... :()

Nandan said...

sahich. alone (ekaTaa) aaNi lonely (ekaakee) madhalaa jo farak aahe, to shevaTachyaa vaakyatoon perfect vyakt hoto.

Tulip said...

chhan ch lihil ahes vidya.

Sneha Kulkarni said...

Kay mast lihile aahes! agadee manatala utarvala aahes janu.. :)

Vidya Bhutkar said...

सर्वांचे प्रतिसादाबद्दल अनेक आभार आणि मला काय वाटतं हे समजून घेतल्यावद्दल. बरेचदा, या स्वत:वरच्या प्रेमाला लोक 'स्वार्थ' असं नाव देतात आणि मग जे हवं ते करता येत नाही की बोलता येत नाही. पण इथं बिनधास्तपणे मांडता आलं याचाच आनंद जास्त आहे. :-)क्ठलंही दु:खं कायमस्वरुपी नसतं,आणि असलं तरी हे जग कुणासाठी थोडीच थांबतं. मग असं असताना स्वत:चा विचार करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं.एकटं जगण्यातही मजा आहे जी अनुभवायला मला तरी आवडतं.

-विद्या.

Vaidehi Bhave said...
This comment has been removed by the author.
Vaidehi Bhave said...

Hi Vidya,
thanks for your comment...
मी तुम्ही लिहिलेल्या काही शॉर्ट स्टोरीस वाचल्या..खुपच छान आहेत ...मला अशा शॉर्ट स्टोरीस खूप आवडतात... असेच छान छान लिखाण करा ..यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा

Monsieur K said...

amazing story vidya!
yeah self-love can often be mistaken in a negative aspect.
as a child, we probably do love others unconditionally. but as years pass by, we lose that innocence in ourselves, and the trust in others so much so, that loving someone else more than ourselves becomes next to impossible.
the problem is - the child within us always keeps fighting the adult within us... and fortunately or unfortunately fails miserably most of the times...

Anonymous said...

Vidyatai tumhalahi Tulip chya post ni na lihinyachi bhural ghaatli ki kay?

Anonymous said...

too good, i totally agree with abhi J

A said...

खूपच छान... अगदी भावना ओतून लिहीलं आहेस!!
सुंदर !
असंच छान लिहीत जा..

Unknown said...

tooooooooo goood !!!!!


khupach sunder

Anonymous said...

farach chan!!!!