Wednesday, January 28, 2009

मी खूष आहे !!

आता हे जाहीर करण्याची काय गरज? तर ही जाहीरात नाही फक्त एक statement आहे. झालं असं की खूप दिवसांपासून मला इच्छा होत होती एक भाजी खाण्याची, शेंगसोला. आता कितीतरी लोकांना हे नाव माहितही नसेल. संक्रातीच्या आधी, भोगीच्या दिवशी ही भाजी बनवतात. पण मग त्याला लागणाऱ्या भाज्याही विचित्रच आहेत. पावटा, ओला हरभरा, वांगं, गाजर, शेंगदाणे, बोरं इ. :-) एकतर हे combination किती odd आणि तेही अमेरिकेत यातला ओला हरभरा, ताजा पावटा मिळणं अजून दुर्लभ. पण यावेळी माझं नशीब जोरावर होतं. मला या सर्व भाज्या मिळल्या अगदी ताज्या. आणि भाजी केल्यावर त्याची चवही अगदी आई करते तशीच....... :-P मग त्याबरोबर तीळ लावलेली बाजरीचीच भाकरी हवी. :-) ते पीठ काय मिळतंच, पण चक्क जे मिळालं त्याची एक अखंड भाकरीही झाली. नाहीतर दोन-तीन तुकडे पडल्याशिवाय भाकरी काही होत नाही इथे. एकूण काय तर मला जसा हवा तसा शेंगसोला आणि भाकरीचा बेत पार पडला. अगदी संदीपला वाटीभरच मिळेल असं सांगून उरलेला सर्व संपवूनही टाकला आणि तृप्तीची एक ढेकर दिली................. :-) ........... म्हणून मी खूष आहे!!!
हे सगळं लिहिण्याचं कारण असं की ’मी खूष आहे’ जेव्हा असं म्हणत होते तेव्हा लक्षात आलं की आजकाल दिवसभरात किंवा अगदी महिन्याभरात आपण असं कितीवेळा म्हणतो की मी आज खूष आहे? त्यासाठी मग अगदी छोटं कारण असो नाहीतर खूप मोठं. मग स्वत:बरोबरच बाकी लोकांचं निरीक्षण करताना दिसलं की आजूबाजूलाही कितीतरी लोकं आहेत की ज्यांना ’I am happy today !' असं म्हणायला अगदी जीवावर येतं. दिवसभरात आपल्याला आनंदी असण्यासाठी एक कारण मिळू नये?
एखाद्या सोबत काम करणाऱ्या माणसाने म्हटलं, how are you? तर आपण पटकन 'Good' म्हणून सोडून देतो, तेच एखाद्या प्रेमळ मित्राने विचारले, ’काय रे कसा आहेस’, तर ’अरे एकदम मजेत’ असं म्हणायला काय पैसे पडतात का? मी समजू शकते की आपली दु:खं जवळच्याच माणसांना सांगता येतात, पण म्हणून रडतच रहायचं? आज काय खूप थंडीच आहे, उद्या काय कामच खूप होतं, परवा अजून काहीतरी.
एका व्यक्तीला जुन्या नोकरीत रहायचा अगदी कंटाळा आला होता. मग नोकरी शोधण्याची मारामार कशी चालू आहे याबद्दल दु:खं. नवीन नोकरी मिळाली तर पूर्वीचीच कशी बरी होती याचं रडगाणं. मग म्हटलं बाबा घरी जाऊन ये. आता भारतात आई-बाबांना भेटलास, सही वाटत असेल ना? असं विचारलं तर कसलं काय. इथे येऊन आजारीच पडलॊ म्हणून दु:खं. काय त्रास आहे राव लोकांना?
असंच जर चालू राहिलं तर मग यांना आनंद तरी मिळतो कधी आणि कशात? बरं, यांचं आयुष्य काही अगदी वाईट चाललेलं नसतं. रोजचं जेवण-खाणं, रुटीन अगदी सिनेमाला जाणं, फिरायला जाणं अशी करमणूकही चालू असते. मग जवळच्या माणसाने विचारलं की बाबा कसा आहेस तर लगेच तोंड वाकड करायला काय होतं?
मला अजून एक गोष्ट आता ध्यानात आलीय की हे रडणारे लोक नुसते स्वत: रडत नाहीत तर समोरच्याला असं भासवून देतात की तुला काय,तुझं सर्व ठीक चालू आहे ना. म्हणजे नुसतं स्वत: दु:खी नाही रहायचं, समोरच्याला तू सुखी असण्याचा गुन्हा केलायस असं वागवायचं. मग अशा लोकांशी बोलताना स्वत:चा आनंदही व्यक्त करता येत नाही का तर ते दु:खी आहेत. जणू काही यांच्या दु:खाला समोरचाच जबाबदार आहे. या सर्व लोकांनी कदाचित आयुष्यात खरी दु:खं भोगलीच नाहीत बहुतेक म्हणून कारणं उकरून काढून रडत राहतात. पण खरं सांगू मला एक कळलं आहे, Its ok to be happy. Its not a sin to be happy and express it.
तर एकूण काय की ’मी खूष आहे’ हे म्हणणं प्रत्येकाच्या ’बस की बात नही’. होय ना? जमलं तर स्वत:ला कधी हा प्रश्न विचारून बघा काय उत्तर मिळतं. :-)
मधे एकदा एका जुन्या ’मित्राने’ विचारलं, ’कशी आहेस गं? घरचे सर्व मजेत ना? संसार कसा चाललाय?’ आणि सर्वात शेवटचा त्याचा प्रश्न होता,’ सुखी आहेस ना?’ त्या प्रश्नावर खरंच मला एका क्षणात माझ्याकडे असणार्या सर्व गोष्टींची जणू यादीच डोळयासमोर दिसली आणि एक मिनिट विचार करून समाधानाने उत्तर दिलं,’ होय, सुखी आहे मी. :-) ’ त्यावर त्याने फक्त ’:-)’ उत्तर दिलं आणि निघून गेला. पण पुढचे पाच मिनिटं मी सुन्न होऊन बसले होते.
-विद्या.
(खूप महिन्यांनी लिहित आहे आणि अगदी जसं डोक्यात येतंय तसं. गोड मानून वाचून घ्यावे ही विनंती. :-) )

11 comments:

a Sane man said...

:)

Anonymous said...

कधी कधी मला वाटतं की रडणारे लोक सारखे खांदा शोधत असतात टेकून रडायला. :)

मस्त लिहिलं आहेस.

Anand Sarolkar said...

Mast lihila ahes. Majha ek mitra ahe to pan asach sarkha radat asto. tyacha phone ala ki malach tension yeta aj kay aikayla milnar mhanun...tyachi atahvan jhali.

Maithili said...

It is too good. kharetar gelya kahi divasan pasoon mi pan ashich RADI zaley. shalet asatana happy go lucky mhanun famous asaleli mi collage madhye jatana asa kahi chehara karate ki bas.
kharetar collage la jane hi ek shiksha banali aahe mazya sathi. pan tari suddha aatta mi I M HAPPY mhananyacha prayatna karen. thanks for open my eyes!!!

Abhijit Bathe said...

हे पोस्ट आज वाचतोय - कालच निल्या नावाच्या माझ्या मित्राला फोन - तो पण मुद्दाम यासाठी केला कि - परवा भारतात गेलो होतो तेव्हा आतेबहिणीशी तिच्या करियर वगैरे बद्दल बोलत होतो - तिला म्हटलं - मला तुझ्या फील्ड मधलं काही माहित नाही. तुच कुणी आदर्श शोध आणि तो जसं करतोय तसं कर. म्हणजे तुम्हाला क्रिकेटर व्हायचं असेल तर फार विचार न करता तंडुलकर जे करतो ते करायचं (क्रिकेट बद्दल) - तो १० तास प्रॅक्टिस करतो - तुम्ही करायची वगैरे वगैरे - एनीवे - तर त्यावेळी निल्याची आठवण झाली होती. निल्या म्हणजे शाहरुखचा भक्त - भक्त म्हणजे इतका भक्त कि तो फिल्मफेअरचे दोन अंक विकत घ्यायचा - एकाच पानावर मागे पुढे त्याचे दोन फोटो असतील तर एक कापुन ठेवताना दुसरा फाटायला नको म्हणुन. त्याची तेव्हा टर उडवायचो, पण त्याने शाहरुखचा ’positive attitude' कोळुन प्यायलाय हे बहिणीशी बोलताना जाणवलं. नीट विचार करुन आठवायला लागलो तर मागच्या १२ वर्षात निल्याने - हे मला जमणार नाही अथवा झेपणार नाही - असं कधीच म्हटल्याचं आठवलं नाही. मग ते अभ्यासात असो, नात्यांत असो किंवा करियर मध्ये.

पण यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे - मला लागलेला हा शोध मी त्याला ऐकवला नाही तर तो अपुरा आहे असं वाटायला लागलं. महिनाभर विसरत विसरत त्याला शेवटी काल फोन करुन ते सांगितलं. मुद्दाम एवढंच सांगायाला फोन केला आणि एवढंच बोललो. याबद्दल त्याचं त्याला जे वाटायचं ते वाटो - मला बरं वाटलं.

सांगायचा मुद्दा असा कि - मी मजेत आहे - हे सांगणारे जर कमी लोक असतील तर - ’मजेत रहाणारा तु दुर्मिळ माणुस आहेस, असाच रहा’ हे सांगायला आपणही हात आखडता घेतो - असा विचार केलायस का कधी? पुढच्या वेळेस निदान ’प्रयोग’ म्हणुन असा प्रयत्न करुन बघ. समोरच्या माणसाला कदाचित silly वाटेल ते - पण कदाचित बरंही वाटु शकेल.

हे सगळं अचानक डोक्यात आलं म्हणुन लिहुन टाकलं. पोस्ट यथातथा झालंय पण पोस्टचा essence फ्रेश वाटला. त्य़ाचा तुझ्या long gap शी काही संबंध नसावा पण. अशीच फ्रेश पोस्ट्स लिहीत रहा. बांधीव नीटनेटक्या आणि सुबक सुंदर पोस्ट्सपेक्षा असं काही वाचायला मजा येते.

सखी said...

वरच्या पोस्टशी ब-यापैकी सहमत. खरं आहे खूपदा हसरं, आनंदी व्यक्तिमत्त्व आसपास असूनही आपण तशी खुली दाद द्यायला विसरतो किंवा काहीही कारण असो.
पण थोडा विचार करायला लावणारं पोस्ट आहे हे निश्चित! :)

Anonymous said...

आज पहिल्यांदा तुझे लिखाण वाचतेय आणि आता ही तिसरी पोस्ट वाचलिये ...शब्दश: पटतय सगळं..
आता ’मी खूश किंवा तृप्त आहे’ असे मी जेव्हा जेव्हा म्हणते ना तेव्हा मला कायमच मी तसे का नसावे ,आणि आयुष्यात किती प्रकारच्या अडचणी येउ शकतात असे सांगितले जाते....मला खरच कळत नाही की बऱ्याच लोकांना का नाही सहन होत कोणीतरी आनंदी असलेलं....मला नाही रडत बसता येत...दु:ख किंवा न आवडणारे प्रसंग येतच असतात...त्यांना आयुष्याची फूटपट्टी लावून बघावी, ते खुप लहान वाटतात...
रोज कितीही जगलं तरी खूप काही सुटतय असे वाटते मग इथे रडायला वेळ कोणाला आहे?

Meghana Bhuskute said...

कसलं खतरनाक लिहिलंयस. विशेषत: तो पॅरा - समोरच्याला दाखवून देत असता...
आता दर वेळी 'फाइन' म्हणताना ते आठवणार. :)

Chimu said...

hi Vidya
I was introduced to your blogs quite recently ..but u know what..i have started liking them !! I also want to write myself but since many days its only a thought..no action on it somehow..but yours blogs inspire me todo it :):)

keep it up..
~ek punekar

Dk said...

Its ok to be happy. Its not a sin to be happy and express it>> Too good! ya really we do not express it & then it becomes the problem. I just loved this post of yours :))))))))))))))

@ Abhi, Yes!! 100 % +ive attitude helps a lot. :)

Unknown said...

very Nice!!! ya post ne mala khup vichar karanyas bhag padle aahe..ani tumchya likhanatun mala pan likhanachi ek Disha mailali aahe.Thank you so much for this posting...Agin Abhinandan plz send me next post...witing!!!!!!!