Friday, May 15, 2009

काय करावं?

परवा ना खूप दिवसांनी online radio वर दिल चाहता हॆ मधलं तनहाई गाणं लागलं होतं. अर्थात गाणी चालूही असली तरी प्रत्यक्षात त्यात मन अडकलंय असं आजकाल फार कमीच होतं. त्यातही गायकाचा आवाज ऎकून त्याचं कौतुक करावंसं वाटावं किंवा शब्दांनी उदास/आनंदी व्हावं हे अजूनच दुर्मिळ. असो. पण DCH मधला एकटा फिरणारा आमीर आठवला आणि पुन्हा एकदा त्याची लवस्टोरी बघावी असं वाटलं. मग म्हटलं राहूच दे. आजपर्यंत एकदाही असं झालं नाहीये की DCH पाहिलाय आणि उदास झाले नाहीये. खरंतर त्याचा शेवट किती सुखदायी आहे अगदी positive ...त्यातली अवखळ प्रीति झिंटा,उनाड आमीर, विचारी अक्षय आणि मजेशीर सैफ आणि त्यांची ती निखळ मैत्री...सगळंच कसं हवंहवसं...पण पण तरीही मनाला कसली खंत लागून राहते तो पाहिल्यावर माहीत नाही. विशेषत: रविवारी संध्याकाळी तर तो अजिबात पाहू नये. बरं झालं आज लिहिलंच याबद्दल ते. परत राहून गेलं असतं.
घाई करायचं कारण म्हणजे परवा संदीप २९ वर्षाचा झाला, लवकरच मीही होईन. मग वाटलं कशाला वेळच मिळत नाहीये किंवा मीच कुठल्यातरी तंद्रीत असते आणि खूप काही राहूनच जातय. बघताबघता सानू दोन महिन्यांची झाली. तिचे थोड्या दिवसांपूर्वीचे फोटो पाहून वाटलं अरे ही किती मोठी झाली, तिला सारखं बघत राहिलं पाहिजे, नाहीतर वर्षभराची होईल आणि तिला मनभरून पाहिलंच नाही असं वाटेल. बरं आपण मोठे होतोय म्हणजे आई-दादाही वयस्कर होताहेत. दम लागणारी आई आणि गोळ्या घेणारे दादा पाहिलं की पोटात कालवतं. वाटतं कुणीच मोठं नको व्हायला. मीही आणि तेही.
आमची ३री anniversary झाली मागच्या महिन्यात.बघता बघता इतकी वर्षे निघून गेली. ८ वर्षापूर्वीचा तो अजूनही डोळ्य़ांसमोरून जात नाही. त्याचं ते हसू संसारात हरवून जाण्याआधी त्याच्याबरोबर आपणही हसलं पाहिजे.
सानुसाठी आई-दादा घर सोडून इतके दिवस इथे राहिले, त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे, फिरून सर्व दाखवलं पाहिजे. उद्या जातो म्हणतील तर काय करू? TV,laptop सर्व बंद करून नुसतं समोर बसून राहिलं पाहिजे त्यांच्या. आईच्या हातचं खाल्लं पाहिजे त्यात चुका न काढता...... सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि रात्री उशीरा झोपलं पाहिजे. अगदी आला आला म्हणता संपून जाणारा वीकेन्ड थांबवला पाहिजे. काय करावं काही सुचत नाहिय़े.कुणीतरी थांबवता का रे हे संपणारे दिवस?
-विद्या.

11 comments:

Yawning Dog said...

पूर्वीपण तुझ्या ब्लॉगवर मी DCH च्या रेफरन्सनी लिहिलेले वाचले होते.
शेवटचा परिच्छेद फारच सुंदर आहे

सर्किट said...

:) hmm.. kharaye tu mhanates te.

malahi aaj sakaLi ch Rafi cha gaaNa aaThavala hota,

"dinn jo pakheru hote, pinjaDe me main rakh leta.. paalataa unko jatan se, moti ke daane detaa.. seenese raheta lagaaye!! yaad naa jaaye beete dinonki..."

good post!

Salil Chaudhary said...

kitihi avadate gaane laagale tari tyat halli man ramat nahi, he khara aahe.
sagalach badalalay
punha lahaan honyaace sagalech maarg band zalet.

sundar lekh.

अनिकेत said...

खरं आहे तुझं म्हणणं. येणारा दिवस येतो आणि फार काही न घडता जातो ही. आणि मग हुरहुर रहाते की अरे आज विशेष असे काहीच नाही केले. दिवसावर दिवस जातात आणि सतत वाटत रहातं हे करायचे आहे, ते करायचे आहे पण कधी? हे दिवस थोडे थांबत का नाहीत?

bhaanasa said...

खरयं ग. काळाला पकडून ठेवावे असे क्षण येतच राहतात. माझे आई-बाबा इथे आले त्या त्या वेळी आणि हल्ली मी जेव्हा जाते आईकडे, खरेच वाटते ग पुन्हा माझे आई-बाबा पंचवीस वर्षावूर्वीचे होतील का? अनेक प्रसंगांचा Re-take घ्यायला आपल्याला सगळ्यानाच आवडेल.

सर्किटने म्हटले तसे, दिन जो पखेरू होते, पिंजरे मे रख लेता....अगदी नक्की केले असते आपण हे.

छान लिहीले आहेस.

Dk said...

आला म्हणता संपून जाणारा वीकेन्ड थांबवला>> hmm te jara kathin aahe nahi ka? pan purntaha enjoy kel tar kaay majja yeil. sadhya us saarkhe ithe hidays a week karaaycha ka hyawar charcha chalu aahet! :D :D

lahan mule patkan mothee hotat he maatr khareCH

अपर्णा said...

DCH च्या अनुषंगाने मला वाटतं ज्यांना हा चित्रपट आवडतो त्या सर्वांनाच nostalgic व्हायला होत असेल ना?? छान आहे ही पोस्ट. मीही सध्या काही क्षण असे मुठीत घट्ट धरुन ठेवायच्या प्रयत्नात आहे. पण अर्थात ते शक्य नसतं...माहित असतं पण काय करणार मन हेका सोडत नाही आणि मनाला थांबवताही येत नाही आशाच्या गाण्यासारखं...जरा थांब ना म्हणून....

seema tillu said...

khare aahe. kaahee divas ultun gelyavar mag chutput lagte na kelelya va anubhavlelya goshtinchi. vishesh karun aai vadilanchya babteet.

Ganesh D said...

Hi Vidya,
I was going through my blog parikatha.wordpress.com today, and found your comment there congratulating me on my marriage. I've almost stopped blogging on that blog nowdays, but oftentimes I go their and become nostalgic about those days. Everything is going well, but again as you wrote in the last para of this post, days are moving fast and life is so demanding that we can hardly find any time to be with each other.

I also read your post about 'The pursuit of happiness' on your English blog. That movie is very much special for me. I watched it while we were expecting our first baby on that day.

Your writing style is very nice and keep writing, I'm following you in my reader.

~Ganesh.

Ajit Ghodke said...

Nice blog Vidya ....Really dont know what to do...

maheshpatare said...

हं, मलाही बरेचदा असंच फील होत होतं. पण काळ कुणासाठी थांबत नाही, हेच खर. नियतीच अनिवार्यपणे गरगर फिरत राहणार 'हे चक्र' महान संयमान सहन करीत जगत राहायचं...