Friday, April 13, 2007

कुणीतरी हवं असतं.....

मी Engg साठी बाहेर पडल्यानंतर घरी २-३ दिवसांत तरी फोन व्हायचाच. एरवी मी आईशी कितीही बोलले तरी परिक्षेच्या वेळी मात्र दादांशी आधी बोलायचे. का? कारण मी अभ्यास करत नाही, नुसती भटकंती करते, आणि पूर्वीसारखे मार्कही मिळत नाही याबद्दल आईकडे कितीही तक्रार केली तरी माझ्याशी फोनवर बोलताना ते प्रेमाने नेहमीच्या सूचना देतच असत. "कशाचं जास्त टेन्शन घेऊ नकोस. ज्या प्रश्नांच उत्तर येतं ते आधी लिही, मग बाकीच्यांचा विचार कर, आधीच्या पेपरचाही विचार करु नकोस. इ.इ....." आजही कधीतरी घरी फोन करून सांगितलं ना की काम खूप आहे, कामाचा कंटाळा आला आहे, इथं रहावंस वाटत नाही, की ते म्हणतात, त्रास होत असेल तर नको राहूस तिकडे. निघून ये परत. आपल्याला काही नोकरीवाचून अडलं नाहीये. कधीतरी ते असंही म्हणाले होते की, "तुला काय वर्षाला एखादं ज्वारीचं पोत पुरेसं होईल, कशाला तो नोकरीचा त्रास? " :-) आता माझं एका ज्वारीच्या पोत्याने भागणार असतं तर किती बरं झालं असतं. पण केवळ बोलल्यामुळेही किती बरं वाटतं. असंच कुणीतरी हवं असतं.....
कितीतरी वेळा सगळी गणित चुकत जातात आणि मागे फिरून ती दुरुस्त करणंही अशक्य होऊन जातं.बरेच वेळा सर्व प्रयत्न करुनही आपल्या हातात काहीच नसतं. मग तेव्हा कुणीतरी हवं असतं आपल्याला सांगणारं,समजावणारं, "सर्व काही ठीक होईल". दोघांनाही माहीत असतं की सगळं ठीक होणं अवघड आहे, तरी त्या शब्दांनी जो धीर मिळतो तो वेगळाच. कधी वाटतं, झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून धीर देण्याइतकं प्रेम कुणी आपल्यावर कसं करु शकतं? ते फक्त आई-बाबाच करु शकतात किंवा आपले खरे मित्र-मैत्रिणी.नाहीतर माझ्यासारखे लोक आधी, 'बघ, मी सांगितलं होतं.....' या वाक्यानेच सुरुवात करतात. :-) कुठल्याही अडचणीत असताना, उपाय शोधायचं सोडून ती चूक तुझ्यामुळे झाली की माझ्यामुळे यावरच वाद घालत बसतात आणि मग नंतर साथ न दिल्याचा पश्चाताप करतात. जित्याची खोड....! मी कशीही असले तरीही मी निराश असताना सांभाळणारं, समजावणारं कुणीतरी हवंच असतं......
-विद्या.

9 comments:

Abhijit Bathe said...

तुला काय वर्षाला एखादं ज्वारीचं पोत पुरेसं होईल - is an amazing thought!
We spend our entire lives worrying about - life!
भारतात असताना माझ्या साईटवर एक सुतार एके दिवशी कामावर आला नाही. मी दुसऱ्या एकाला त्याबद्दल विचारलं तर तो म्हणे - साहेब त्याला दु:ख झालंय.
मला वाटलं - बाप रे! घरी कुणी...
तर तो म्हणे - नाही साहेब - तसं नाही. त्याला लागलंय. जखम झालिए. त्याला आम्ही दु:ख झालं म्हणतो.
मी बहुतेक त्यावेळेस प्रेमभंगाच्या कि आणखी कसल्यातरी 'रुटीन' दु:खात होतो.
आणि मला वाटलं - भेंडि - हे खरं दु:ख. च्यायला अंगाखांद्यावर एक ओरखडा नाही आणि मी कसल्या दु:खाच्या गमज्या मारतो...
त्यानंतर मला कधी (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सराची) 'रुटीन' दु:ख झाली नाहीत असं नाही. पण 'दु:खाने बोअर' व्हायला झालं कि मला 'खरं दु:ख' चा डोस आठवतो...

Thats why I think 'तुला काय वर्षाला एखादं ज्वारीचं पोत पुरेसं होईल' - is an amazing thought! :)

स्वाती आंबोळे said...

विद्या,

अगदी मनातलं लिहीलंयस. वाचताना जाणवलं की मीही (इतकीSS matured असून) बरेचदा 'बघ, मी म्हटलं नव्हतं..'ने सुरुवात करते.. चूक कोणाची हे ठरवण्यात वेळ घालवते..
आता लक्षात राहील हे. :)

Maithily said...

"कितीतरी वेळा सगळी गणित चुकत जातात आणि मागे फिरून ती दुरुस्त करणंही अशक्य होऊन जातं.बरेच वेळा सर्व प्रयत्न करुनही आपल्या हातात काहीच नसतं ......कधी वाटतं, झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून धीर देण्याइतकं प्रेम कुणी आपल्यावर कसं करु शकतं? ते फक्त आई-बाबाच करु शकतात किंवा आपले खरे मित्र-मैत्रिणी.

Zalelya chukanmuley aai-baba kadachit disappoint zaley asu shaktat.. Pun jase tu mhanalis ki chukankade durlaksha karun tumhala dheer denyaitke prem ... Khup chan lihilays, Vidya... I can very well relate ..

Vidya Bhutkar said...

अभिजीत, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, आपण एवढ्याशा गोष्टींचाही बाऊ करतो तेव्हा ही अशीच वाक्य़े आपल्याला परिस्थितीची जाण करून देतात. :-)
स्वाती,स्पेक मी पण आजकाल टाळतेय 'बघ मी म्हटलं नव्हतं...'असं म्हणणं. पण खूप अवघड आहे ते!

Thanks all for the comment.

-विद्या.

Monsieur K said...

hi vidya,

it is indeed very difficult to have s'one who supports you through good times and bad times in life with unconditional love, trust & support. in 99% cases, it is your parents. friends are there at times, but they cant be with you forever.
and yes, i have to admit this - instead of supporting or finding a way out, we tend to spend time in fault-finding. :(

this post is very well-written.
and thanks for the comment on my blog too.

~ketan

Anonymous said...

chan lihile aahes..

http://www.youtube.com/watch?v=CUxsJIxE784

rahul said...

hi vidhya

hi rahul with u

whats doing

where ru

r u same vidhya bhutkar from koregaon be comp..if same

iam ur classmate

rahul
dubai

Unknown said...

Its nice 2 cur profile..blog...tu khup chaan marathi lihates...by the way tu kuthe aahes...Tuja kk travela cha pravas vachala..ma la hi asach experiance yeto...

this is rahul ur 12th class mate koregaon..Recognized me..

best of luck
rahul ghorpade
Director
GREEN CORNER GROUP OF COMPANIES
DUBAI-UAE

Unknown said...

manatalya bhavana utarvlyas g vidya tai ...... agadi khar ahe majhe aai baba pn same asech ahet ani te ahet mhanunch mi ata kute tari pudhe nighun geley tujha lekh vachala tevha kharch aaiche shabd athavle ..................