Tuesday, April 24, 2007

त्राण निघून गेले....

पुन्हा एकदा वसंत आला आणि पालवी दिसू लागली. पण अजूनही काही सुकलेली झाडे-वेली पाहून काहीतरी लिहावंसं वाटलं ते असं...


दर सहा महिन्यांनी माझ्या सुकलेल्या फांद्यांवर,
तू तुझे किरण घेऊन आलास आणि मी मोहरून गेले.

कुठे लपला होतास जेव्हा मी
वाऱ्यात झडून गेले, थंडीत गारठून गेले.

तुझं हे असं खूप दिवस चाललंय
किती सहन करणार, मी आता थकून गेले.

यावेळी जरा उशीर केलास, पुन्हा मी फुलणार नाही...
तुझी वाट पाहण्यात सारे त्राण निघून गेले....

-विद्या.

2 comments:

चित्तरंजन भट said...

विद्याताई,

कविता आवडली. चांगली आहे.
ह्या कवितेच्या खालच्या कविता फायर फॉक्स ह्या ब्राउजरमध्ये तुटताहेत.


तुमचा ब्लॉग वाचणाऱ्यांसाठी माहिती

कविवर्य सुरेश भट ह्यांच्या नावाने संकेतस्थळ नुकतेच सुरू झाले आहे. मराठी गझल आणि कविवर्य सुरेश भट ह्यांना समर्पित असे हे संकेतस्थळ आहे. www.sureshbhat.in आणि www.sureshbhat.com ह्या दोन पत्त्यांवरून ह्या संकेतस्थळाला भेट देता येईल.

चित्तरंजन भट

Anonymous said...

khoop surekh lihites.
वसंत आला तरी तो आपल्यावर अनुग्रह करणार नाही हे माहीत असून देखील, वाट पाहण्यापेक्शा जास्त झाडं करु तरी काय शकतात?