नंदनने टॅग केल्यावर जरा गडबडलेच होते. :-) हो, नुसत्या छान,सुंदर अशा प्रतिक्रिया देताना सोप्पं असतं पण जावे त्यांच्या वंशा..... असो. मी त्याच्या 'जे जे उत्तम' या उपक्रमाबद्दल बोलतेय.
त्याच्या म्हणण्यानुसार...."पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. "
तर मी बराच बिचार केला की कुठला उतारा द्यावा बरं इथे.पण मला काही केल्या आठवेनाच एखादं पुस्तक आणि आठवलं तरी ते आता जवळ नसल्याने त्यातला उतारा देणं अवघडच होतं. विचार केला त्याला सांगाबं की 'मी जेव्हा भारतात परत जाईन ना, तेव्हा लिहिते,चालेल का?' :-) पण तेही योग्य वाटेना. तेव्हाच मला गेल्या काही दिवसांपूर्वी एका पुस्तकाची अर्धवट का होईना PDF फ़ाईल वाचायला मिळाली होती ती आठवली. ज्यादिवशी ती मिळाली तेव्हाच वाचून पूर्ण केली होती आणि त्यातलाच एक उतारा जो मला कित्येक दिवस अस्वस्थ करत राहिला.
-----------------------------------------------------------------
".......आप्पांना मृत्यू मोठा छान आला. ....डॉक्टर मला म्हणाले,"त्यांना आलेला ऍटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळा राहतीलसे". आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पानी प्राण सोडला.
बिच्याऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती, वाचा, भान सगळे जात चालले; आणि नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पैसा, मनुष्यबळ, काही कमी नव्हते.पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते आणि तेच नशिबी आले. ती आजारी पडताच आम्ही मुंबईला आणले.तिथे सगळी मुले, नातवंडे, लेकी, सुना-सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होती. कामे वाटून घेऊन करत होती. तिऱ़्हाईताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान! कुणी कमी पडून देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुद्धीने, नाईलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करत होती, अद्याप करतेय. समजा, तिच्याऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी औषधोपचार, सेवासुश्रुषा, नवसायास करत राहिली असती. तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षाच्या काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वत:चे औषधपाणी स्वत;च करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती अंथरूणात आराम करयेत आणि दुसरं कुणी तिची सेवासुश्रुषा करतंय असं दृष्य प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला न मानवणारी. आणि दुर्दैवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्यासेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.
आई गेली. मुलेबाळे,नातवंडे,लेकीसुना, अगदी भरले घर होते, तरी तिच्या शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग आता त्याबद्दल लिहून मी दु:ख उकरून काढतेय,का? हे दु:खं नव्हे, हा वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलट्सुलट विचारांचा, भावनाम्चा गुंता आहे. तो सोडवता आला तर पहावा, त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रत्न करावायासाठी हा सारा खटाटोप. या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत, दोन-तीन दिवस, दोन-तीन दिवस असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन.उरलेल्या वेळात माझ्या सव्त:च्या व्यापातच गुंतले होते, घर संसार,प्रुफे, नव्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोट्या व्यवहाराची कामे आणि त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगैरे-वगैरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतही सतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोन छोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कवितावाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन आनंत्रिंसाठीचे वगैरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमात काही अडथळा तर येणार नाही? ऎनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही आमची अडचणही होऊन बसली होती आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक यातना होत. आपण किती स्वार्थी, कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. ..."
".....मी म्हणे लहानपणी लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची स्वत:ची, चुलत दिराची, बरीच मुलेमाणसे घरात होती. स्वैपाकपाणी, आले-गेले, सर्वांचा अभ्यास करून घेणे, सणवार, एअव्हढ्या मोठ्या घर संसारात त्याकाळच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार, जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील! माझ्यापुरते तरी कृतद्न्यतेच्या भावनेने मी तिच्यासाठी काही करायला नको का?आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार? ...."
पुस्तक - आहे मनोहर तरी
लेखिका - सुनिता देशपांडे
-------------------------------------------------------
मी बऱ्यापैकी ब्लॉगवर पाहिलंय की कुणी यांना टॅग केलं नाहीये ना तरी चुकून चुकल्यास चु.भू.दे.घे.
केतन(बरेच दिवसांत तुझं लिखाण वाचायला मिळालं नाहीये..यानिमित्ताने....)
अमित(तुझा 'पुस्तकांची मांदियाळि' मला खूप आवडला म्हणून हा खो.)
कोहम(तुझाही वाढदिवसानंतर हा पहिला पोस्ट होईला ना?:-) या पोस्टमधे काय असेल याची उत्सुकता आहे.)
स्वाती(तुझ्या अनेक सुंदर कवितांसारखी याचीही वाट पहात आहे.)केतन(बरेच दिवसांत तुझं लिखाण वाचायला मिळालं नाहीये..यानिमित्ताने....)
अमित(तुझा 'पुस्तकांची मांदियाळि' मला खूप आवडला म्हणून हा खो.)
कोहम(तुझाही वाढदिवसानंतर हा पहिला पोस्ट होईला ना?:-) या पोस्टमधे काय असेल याची उत्सुकता आहे.)
बडबडी स्नेहल(तुझ्या आवेशपूर्ण लेखांसारखाच एखादा आवेशपूर्ण उताराही वाचायला मिळावा ही सदिच्छा.)
-विद्या.
7 comments:
pustakaachi nivaD aavaDali.
ekach para decide karaNa kharach khuup avghaD aahe!
विद्या, माझ्या आवडीच्या पुस्तकातला उतारा निवडला आहेस :). हा उतारा, आणि याच्या आगेमागेच झालेली सुनीताबाईंच्या मनाची इच्छामरणावरुन झालेली तगमग हा यातला भाग अस्वस्थ करणारा आहे. येथे तो दिल्याबद्दल धन्यवाद. बाय द वे, अजून पाच ब्लॉगर्स ना टॅग करशील का?
surekh niwad. tehi farsa choice available nasatana...
खरंच एकच उतारा देणं फारच अवघड होतं आणि नंदन तू म्हणतोस तसं याच्यापुढचे 'मर्सिकिलिंग' बद्दलचे विचारही खूप अस्वस्थ करतात.
या उताऱ्यात मात्र मला आपल्याच मनात स्वत:च्या स्वार्थासाठी जे विचार येतात, ज्यांची स्वत:लाच लाज वाटते अशा विचारांचं प्रतिबिंब दिसलं म्हणून इथे मांडला.आवड आवडल्याबद्दल आनंद झाला. :-)
-विद्या.
एकच उतारा? :) आणि तो ही गद्यच? :))
लिहीते गं आज उद्यात.
तू दिलेला सुनीताबाईंचा उतारा छान आहे.
maajhahee aavaDeecha pustak.:)
हे दु:खं नव्हे, हा वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलट्सुलट विचारांचा, भावनाम्चा गुंता आहे. तो सोडवता आला तर पहावा, त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रत्न करावायासाठी हा सारा खटाटोप.
he vishesha aavaDala.
Human emotions are most of the times, funny, to summarize. Even if all's well, human mind tends to find those unwanted emotions from the rare end which makes every scenario complex.
Post a Comment