Tuesday, February 19, 2008

मी सध्या काय करतेय?

अर्थात मी सध्या काय करतेय यात कोणाला interest असणार म्हणा. पण माझ्या आयुष्यातील ही एक वेगळीच phase आहे. हो, कारण मीसध्या काहीच करत नाहीये. कित्येक वर्षात असं झालं नव्हतं. पण खरंच मी काही करत नाहीये. :-) फक्त त्रासदायक प्रोजेक्टमधून सुटका करून घेतली.घरी जाऊन दोन महिन्याहून जास्त सुट्टी टाकली. सुट्टीत काहीही केलं नाही, फक्त नोकरीचा राजीनामा दिला. मग पुढे काय होईल याचा विचार न करता दोन महीने घरी पडून राहीले. हो, वजनाचा विचार न करता :-),दर दोन दिवसांत २-४ वडापाव नक्कीच खाल्ले. आपण आता कमवत नाही याचा विचार न करता, मनमुराद खरेदी केली. इथल्या नवीन consultant ने नोकरीवर कधी रुजू होणार विचारल्यावर त्याला महिन्याभर उत्तरच दिले नाही. आणि घरून परत आल्यावरही दोन आठवड्यानंतर असे वाटले की आता काहीतरी केले पाहीजे. पण ते ही फक्त १ आठवडा, नंतर परत निवांत.
तर आता गेले महिनाभर मी शिकागोमधे घरात पडून आहे. नवीन नोकरीचे , नवीन client मिळायचे टेन्शन येते, जाते, मग मी थोडेफार काही वाचते, परत टीव्ही पाहायला लागते. आता या सगळ्यात कुणाला फोन करावा, कुठे फिरून यावं, काही लिहावं, काही वाचावं किंवा लोकांनी काही लिहिलं तरी त्यांना कमेंट टाकाव्या यातलं काही एक मला वाटत नाही. ना मला सकाळ संध्याकाळ काही छान करून खावं, खायला घालावं असं वाटतं. कदाचित मी एक मुलगी असल्याचा हा फायदा असेल म्हणा, पण आयुष्यात एव्हढं निवांत कधी वाटलं नव्हतं. माहीत नाही, ही phase चांगली की वाईट. वाईट,कारण, कुठल्याच गोष्टीबद्दल इतकं निष्क्रिय असणं मला नवीनच आहे. पण Imagine, सकाळी संदीपला bye करायला धडपडत उठून, सोफ्यावर पडून राहीले आणि तो मला पांघरूण घालून, (मला उठायला नको म्हणून) माझा मोबाईल शेजारी ठेवून निघून गेला. :-) यासारखं सुखं कुठलं आणि ते आता अनुभवायचं नाही तर कधी? :-ड
-विद्या.
(आज बरेच दिवसांनी मराठीत टाईप करायला पण जरा कष्टच पडले, पण तेव्हढं चालायचंच. हहाअहा :-) )

10 comments:

यशोधरा said...

>>>दर दोन दिवसांत २-४ वडापाव नक्कीच खाल्ले

अरे वा!! मज्जा आहे न काय!! :) :) खूप काळानंतर मिळणारा निवांतपणाही मस्त एंजॉय करायचा!! गुड लक :)

कोहम said...

chalude chalude......majja chalalali aahe ekandarit....chalude..

vikas said...

although you enjoying this lazyness; you are supposed to be busy with some other work because always to be in some work is a sort of meditetion which may help you to develop the inner personality; to take a rest after some work is physical requirement of body but to be an ideal for longer period is a laziness which will affect your efficiency!!!!!!

Monsieur K said...

i envy you :)

Meghana Bhuskute said...

wow... mala matsar watato ahe...

Nandan said...

sahi aahe :), enjoy till it lasts.

स्वाती आंबोळे said...

अच्छा, हे सुरू आहे तर सद्ध्या! :)

Unknown said...

nice ... ekun kiti vadapav?

छोटा डॉन said...

मस्त आहे लिखाण ...
आपण करत असलेल्या आणि न करत असलेल्या गोष्टी वाचून मज्जा आली ...
आहे वेळ तोवर हाणा वडापाव तिच्यायला !!!

"ब्लॉग" पण मस्त आहे ...
चलू द्या . आम्ही वाचतो आहोत ...

Dk said...

Hmmm aaplee hi vishraantee swkhsheechee aahe! tar aamchee hi sakteechee aahe aani khar tar hya kantalycha hi aata kantala aalaay mala! :(