एक पत्र छान रंगवलेलं
अगदी सुंदर अक्षरात लिहिलेलं,
परवा रात्री कपाटात खालच्या कप्प्यात मिळालं. (सो ss टिपिकल)
तुझ्या जुन्या पिशवीत.
'कधी लिहिलेलं रे मी हे?' मी विचारलं.
तो नुसताच हसला. पण मला आठवू नये हे नवलंच, नाही?
'मी कित्ती पत्रं लिहिली याची गणतीच नाही', तो.
'हो, कारण तू लिहिलीच नाहीस', मी. हे बरं आठवलं?
बरं आठवलं कधी लिहिलंय ते.
पण प्रत्येक वाक्यात 'सोनू,सोनू'करणारी ती
आणि पोरं झोपलीत तोवर सफाई उरकून घेऊ
म्हणत घाई करणारी मी
सारखीच मात्र वाटली नाही.
अर्थात मळक्या बनियनमध्ये बसून
वायरी गुंडाळून नीट लावून ठेवणारा तू
आणि मला भेटायला आवरूनच येणारा तो
हे तरी कुठे सारखे होते? नाहीच.
होतं तरी काय त्या पत्रात?
एका वेड्या मुलीची वेडी स्वप्नं.
हेच, घर, संसार, पोरं, बाळं, सगळं.
वाचताना जाणवलं, बरं ती वेडी
पण देव तरी किती वेडा?
सगळं देऊन टाकलं?
द्यायचच होतं सर्व तर विसरायला का लावलं?
म्हटलं बरं झालं बाई
पत्रात टिपून तरी ठेवलेलं.
डोळ्यात दोन थेंब येउन बंद करून टाकलं.
त्याच्यासोबत पोरांचं एक खेळणंही बॉक्समध्ये टाकलं.
इतकं आवरून दमल्यावरही
पोरांना मायेनं कुरवाळताना त्याला पाहिलं,
वाटलं, हे क्षण डोळ्यात भरून ठेवण्यासाठीच बहुतेक
पूर्वीचं विसरायला लावलं.
-विद्या.

7 comments:
ए ही माझी पोस्ट आहे... तु कशी लिहीलीस ?
:) :)
khup chaan!
कसं नं,’एकाला झाकावं अन दुसर्याला काढावं’
घरोघरी... डिट्टो! :)
gharogharee!!!
kya baat!
Yasho
Khup chhan
Khup chhan
Post a Comment