'हजारो ख्वाहिशें ऐसी......'. माणसाच्या आयुष्यात अनेक अधुरी स्वप्नं, आकांक्षा असतात, काही पूर्ण होतात तर काही अस्तित्वात आहेत हेही आपल्याला माहित नसतं. मागच्या वर्षी मी 'प्रेमपरीक्षा' ही पत्रमालिका लिहायला सुरुवात केली. तेव्हा फक्त एकच इच्छा होती, कुणाला तरी पत्रं लिहायची. पण ती इच्छा हळूहळू एक कुतूहल आणि मग एक आव्हान बनली. कारण पत्रातून एक आयुष्य उभं करायचं. त्या पात्राच्या अवतीभवती होणाऱ्या सर्व गोष्टी पत्रातूनच व्यक्त करायच्या आणि तरीही कथानक कुठेही थांबू द्यायचं नाही, हे आव्हान. जेव्हा पत्रमालिका संपली तेव्हा एक सुंदर गोष्ट बनली होती.
तरीही हे कुणाला पुस्तक म्हणून वाचायची इच्छा असेल असं कधी वाटलं नव्हतं. विक्रमनी जेव्हा मला विचारलं पुस्तकाबद्दल मी अजूनही साशंक होते, हो म्हणाले तरीही. पण ज्या दिवशी या पुस्तकाचं कव्हर मला दिसलं, त्यावर कथेचं नाव आणि खाली माझं, माझ्या लक्षात आलं की मनात कुठेतरी ही इच्छाही होतीच. आपलं एखादं पुस्तक प्रकाशित करण्याची. आणि ती किती तीव्र इच्छा होती हे ते कव्हर पाहिल्यावर जाणवलं. आज हे पुस्तक तुम्हासर्वांसमोर सादर करताना खूप आनंद होत आहे. ही पत्रमालिका प्रसिद्ध केल्याबद्दल आणि मला कायम साथ देत राहिल्याबद्दल 'न लिहिलेली पत्रे' (https://www.facebook.com/NaLihileliPatre/) चे अनेक आभार.
"प्रेमपरीक्षा" !! तुम्हां सर्व वाचकांचे खूप खूप आभार, मला आजवर इतकं प्रेम दिल्याबद्दल. पुस्तकाच्या भारतातील आणि अमेरिकेतील लिंक देत आहे. तुम्हांला आवडेल अशी अपेक्षा.
भारतातील लिंक: https://www.amazon.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-Prem-Pariksha-Marathi-ebook/dp/B07BVPFLJC/ref=sr_1_1?s=digital-text&ie=UTF8&qid=1522760643&sr=1-1
अमेरिकेत: https://www.amazon.com/dp/B07BVPFLJC/ref=cm_cr_ryp_prd_ttl_sol_0
धन्यवाद,
विद्या भुतकर.
2 comments:
Congratulations..... Keep it up...
Congratulations !!! great going!!!!
I regularly read your blog and love to see you expressing !
Post a Comment