यावेळी भारतात होते तेव्हा दोन महिन्यांत बराच प्रवास झाला. मी अगदी बस, ट्रेन, रिक्षा सोबत सहा सीटर, Tempo trax आणि share auto मधूनहई प्रवास केला. त्यात अनेक लक्षात राहण्याजोगे प्रसंगही घडले. कदाचित ते सगळे वाचताना बोअरींग वाटतीलही पण लिहिल्याशिवाय राहवत नाहिये. :-)
मी मुंबईत उतरले आणि समीरसोबत, त्याने बुक केलेल्या KK Travels च्या पुण्याच्या गाडीत आम्ही बसलो. आता गाडी AC असली, नसली किंवा ती दोन तास उशीरा निघाली याने काही फरक पडत नव्हता. I was very much excited just to be there. मी गप्पा मारण्यात आणि आजूबाजूला (अंधार असला तरी) पाहण्यात मग्न होते. पहिले २-३ तास झाले असतील आणि गाडी मुंबई-पुणे हायवे वर बंद पडली.कुणीतरी म्हणालं की हे लोक आजकाल ऱोकेलवर गाड्या चालवतात. :-) त्यामुळे इंजिनाची पार वाट लागते. रात्री ३-४ वाजता हायवेवर आम्ही अशा ठिकाणी होतो जिथे कुणीही mechanic मिळणं अवघड होतं आणि दर एक मिनिटांत मोठे-मोठे ट्रक तिथून जात होते.एरवी मला अशावेळी फार चिडचिड झाली असती किंवा भीतीही वाटली असती. पण त्या क्षणाला मी इतकी आनंदात आणि तेव्ह्ढीच समाधानात होते की मी घरी जाणार आहे की मला या गोष्टींनी काहीच फरक पडत नव्हता. अर्ध्या तासाने कळलं की KK चीच एक गाडी थोड्यावेळात येणार आहे त्यात बसून जाता येईल. काय कुणास ठाऊक ते वातावरण फारच छान वाटत होतं. एका दगडी कट्ट्यावर पहाटे ४ वाजता बसून मी आणि समीर गप्पा मारत होतो. कसलंही tension नाही की भिती नाही. थोड्या वेळात दुसरी KK ची गाडी आली आणि सर्वात पहिली गोष्ट मी केली ती गाडीत घुसून जागा पकडली. :-) कितीही वर्षे,कुठेही रहा, Ur basic habits never die. :-) चार तासात होणारा प्रवास आम्ही ८ तासांत केला. आणि हो, हे KK चे लोक अगदी घरापर्यंत सोडतात बरं का, पण जर तुमचं घर सर्वात शेवटी येणार असेल तर अख्ख्या पुण्याची सैर झाली म्हणून समजा. :-)) पुण्यात बहिणींना भेटून चार-पाच तास विश्रांती घेतली आणि पुढच्या प्रवासाची तयारी केली. Btw, मी आई-दादांना surprise देणार होते. :-) त्यामुळे केव्हा एकदा घरी पोचते असं झालं होतं.
स्वारगेटवर पुणे सातारा लाल-डब्बा मिळाला. समीरने कंडक्टरला सांगूनही ठेवलं की बाबा हीने बराच प्रवास केला आहे, त्यामुळे सातारा आलं की तिला नक्की उठवा.नाहीतर जाईल कोल्हापूरला. मी नुकतीच आल्याने जवळ मोबाईलपण नव्हता. अर्धवट झोपेत मी तो अडीच तासांचा प्रवास केला आणि मी साताऱ्यात उतरले. आता फक्त शेवटचा टप्पा. सातारा-कोरेगांव. :-) तो फक्त अर्ध्या तासाचा रस्ता आहे. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मला कोरेगांव गाडी मिळाली. कोरेगांवला संध्याकाळी जाणाऱ्या गाड्य़ांतून प्रवास करणं जरा अवघडच. एक तर शहरात आपला माल विकायला, खरेदीकरायला आलेले गावतले लोक तेव्हा प्रवास करतात. त्यामुळे गर्दी असतेच, पण त्यात पिऊन तर्रर्र झालेलेही बरेच.:-)
तर मी माझी handbag घेऊन गाडीत चढले. आता ही handbag विमानात कितीही छोटी वाटत असली तरी बसमधे डोक्यावरच्या जागी, किंवा पायासमोर कुठेही बसत नाही. त्यामुळे मला ती दोन ओळींच्या मधे ठेवावी लागली. पहिला stop आला आणि एक ६५-७० वयाचा माणूस आत शिरला. त्याआधी ती ब्याग ओलांडून बरेच लोक गेले होते आणि मला कळतंही होतं की अडचण होतेय, पण पर्याय नव्हता. त्या म्हाताऱ्याने(हो, आजोबा म्हणायची इच्छा होत नाहीये) धडपडत bag ओलांडली आणि माझ्या तिरक्या पुढच्या सीटवर बसला. त्याला धड पाऊलही टाकता येत नव्हतं,( वयामुळे नाही प्यायल्यामुळे)आणि तो सुरु झाला. ’असे कसे ठेवतात रस्त्यात सामान. शिकलेले लोक नव्हं तुम्ही, कळत न्हाय काय?मी कोण हाय माहीत नाही तुम्हाला. कंडक्टर कुठाय? बोलवा त्याला, मग सांगतो मी....’ मी शांतपणे समजावयाचा प्रयत्न केला, पण तो सुरुच.मी गप्प बसले होते, पण शेवटी माझ्या मागच्या माणसाने बोलायला सुरुवात केली,’अहो गप्प बसा ना जरा. सांगितलं ना, बसत नाय वर ब्याग म्हणून.किती कटकट लावलीय.बसलाय ना जागेव एका, बसा ना मग.’ शेवटी असं झालं की bag माझी, मी गप्पच आणि हेच दोघे भांडत आहेत. कसाबसा तो अर्धा गेला आणि माझ्या नशिबाने मी त्या म्हाताऱ्याच्या आधीच उतरले नाहीतर अजून एकदा शिव्या बसल्या असत्त्या. :-))
गावांत उतरले आणि मंगळवार! एकही लाईट नव्हती गावात, ना कुठल्या घरात ना रस्त्यावर. कसबशी रिक्षात बसले आणि घरचा पत्ता सांगितला.त्याने रिक्षा इतकी जोरात घेतली की माझ्या हातातले पैसे कुठेतरी उडालेच. माझ्याकडे जास्त सुटे पैसेही नव्हते आणि होते त्यात काही इथले पैसेही मिक्स होते. घराजवळ रिक्षा आली, अंधारातच अंदाजाने पैसे दिले. घराबाहेरही इतका अंधार होता की आई-दादा घरात नसतील तर घाबरून जाईन म्हणून रिक्षावाल्यालाच एक मिनिटं थांबवून ठेवावं असं वाटलं. पण मी पैसे देताच तो निघून गेला आणि मी घरात घुसले.
२ वर्षांनी घरात येताना रडून येतंच होतं. बाहेरच्या खोलीत एक मेणबत्ती जळत होती. दाराचा आवाज झाला म्हणून आई बाहेर आली. तिला अंधारात कळेना की कोण आलंय. मी पट्कन आईला मिठी मारली आणि तेव्हां आईला कळलं की ती मी आहे. तेव्हढ्यात दादा बाहेर आले. त्यांना तर अजून काही कळेना. मेधा(माझी बहीण) सकाळी तर पुण्याला गेली होती, आता परत कशी आली आणि आईला मिठी मारून रडतेय का? :-)) मग त्यांनाही अशीच मिठी मारल्यावर कळलं की मीच आहे. जरा सर्व शांत झाल्यावर आईने सांगितलं,’ हे बघ, calender घेऊनच बसलोय,तू कधी येणार आणि तुला आणायला कसं, कधी जायचं ते. तू आधीच आलीस आणि सगळंच फिसकटलं. :-)’ फार तर २०-२५ मिनिटं बसले असेन मी बोलत. आईला म्हटलं काहीतर जेवायला दे आणि मी झोपते. आईने मस्तपैकी भाकरी आणि मेथीची भाजी केली होती. ती खाल्ली, आंघोळ केली आणि गादीवर पडल्याच्या दुसऱ्या क्षणाला मी झोपलेले होते. :-)) मी शिकागोमधून निघाल्यापासून घरी पोचेपर्यंत ४४ तास सलग प्रवासात गेले. But it was worth it. I was home.
-विद्या.
P.S. ज्या हेतूने मी लिहायला सुरुवात केली होती त्यापासून जरा भरकटलेच. पण पुढचे वर्णन पुढच्या भागात....
18 comments:
Same experience with KK travels
1 la nighalelo 8:30 la ghari pochalo :-) - Shantanu
>>मग त्यांनाही अशीच मिठी मारल्यावर कळलं की मीच आहे.<<
डोळ्यात पाणी आलं..
मनस्वी
आईबाबांना भेटायला जाण्यातला आनंद काही वेगळाच नि असलं सरप्राईझ!!! :-)) आनंदून गेली असतील दोघं.
मनापासून लिहिलयंस. आवडलं.
Are wa...Satarayache blogger baghun khup anand zala.. :)..Changle lihle aahe...
Welcome home.
मुंबई पुणॆ प्रवासात या ट्रॅवल्स वाल्यांच्या गाड्यात चुकुनही बसु नये. वेळेची नासाडी. परत या सीट खुप विचीत्र असतात. दादर वरुन सुटणारी शिवनेरी किंवा महाबस उत्त्तम. किंवा सरळ एखादी खाजगी गाडी (टॅक्सी) करावी .या बस च्या भानगडीत पडु नये. आम्ही तिघेजण पुण्याला घरी जातांना मूंबई पुणॆ टॅक्सी सर्वीस ची टॅक्सी घेतो. संपुर्ण गाडीचे रु. १२६०.०० घर पर्यंत सोडायचे असेल तर २५०.०० अधीक. ते खुप सोईचे पडते.
स्वारगेट ते सातारा , मधे कुठेही न थांबणारी एस.टीची २ * २ ची गाडी चांगली आहे.
पण आता घरीच पंख लावुन परतायचच आहे म्हटल्यावर !
काल ’Once' नावाचा पिक्चर बघत होतो, (btw - तु अमेरिकेत रहातेस तर (आणि तुझ्याकडे Netflix असेल तर) अवश्य बघ) तर ’The Namesake' चा trailer पाहिला. Actual पिक्चर trailer पेक्षा कितीतरी चांगला आहे, पण एक वाक्य आवडुन गेलं -
’The greatest journeys are the ones that bring you home!'
माझा प्रवास मला दिवसेंदिवस घरापासुन लांबच नेतोय. त्याची दिशा बदलाविशी वाटली तुझा लेख वाचुन!
tu pan satara jilhyatali :) kiti mast :)
mI pan ghari jate tevha ithun gharun nighun tithe ghari poche paryant mhanaje javalpas 50 tas pravas hoto. by as you said - its worth evry minute of it.
tikadachi bhasha vachun mast vatale... pudhachya post chi vat pahatey.
majhahi chicago-koregaon prawas asach jhala.. pan mee S.T. peksha "wadap" prefer keli satara te koregaon.... wadap madhye warti carriage war thevaleli mee majhi bag.. aani pratyek paach minitala chaltyaa gaaditun ardhaa sharir baaher kaadhun bag aahe ka te dokaaavun baghat hoto.. :)..
लेख आवडला, छान लिहिलाय. सरप्राईझ देण्यात काय मजा असते, ते मीही गेल्या खेपेला अनुभवलं. नुसता आपला चेहरा पाहून कुणाला आनंद होतो, ही भावना बरीच सुखावणारी असते. पुढचा भाग लवकर येऊ दे.
Yes...Being home is the greatest thing of all. Ani itaka lambcha pravas karun ghari jayla tar khup mast vatata.
pravaas-varnan mast jhaala aahe.
cant believe tht u could stay away from home for 2 years. but nevertheless, u must hv enjoyed every second of your long journey back home.
as abhijit pointed out, ’The greatest journeys are the ones that bring you home!'
btw, tulaa kho dilaa aahe.
tar nakki lihi tyaavar :)
chan lihilays.. :)
ghari paratnya cha pravas asa stoch exciting.. i mean kuthlyahi goshti ni chid chid kinwa irritation hot nahi...:)
Chan lihila aahes....
bharatat ghari parata jatanachi excitement level hi nehamich wegali aasate... good good...
btw.... KK travels... ekadach anubhav ghetala...horrible hota.... bus la aag lagali hoti amachya...
keep writtin
Hi Vidya, this is Manisha from Mumbai.
Mi tuja blog purna vachala, khupach great lihalay tu, agdi manala bhavata ani tyamulech tuja blog ekada pustak havrepanane vachun sampavato tasa mi tuja blog purnapane vachala.
Tujya laghukatha, pravasawarnane phar bhavali and u really written nice on Human relation.
Keep it up dear tujay vachakanmadhe ajun ek maji bhar padli.
All D Best.
Hi this is gayatri, want to know that what happened after when you went to america want to what happened about your love and about you
KK travels kaay prakarn aahe he mahit naahi (coz mubaitCh raahilyamule busheene prawas kadhe to kelaach nahi :( aani jo kela te mumbai to kolhapur vagaire railwaynech! BTW koregaaon he saatar chya pudhe mhnje kolhapur sidla yete ka?) but u njoyed na? mag zaale lihinyacha hetu kaaye vagaire mala shevTaaprynt jaanvlehi naahi ajyaabat! :) too good too senti...
shabd tuje wachale an aathwani jagya zalya.------tuzi sampada
Post a Comment