परवा हॅलोवीनला मुले ट्रिक ऑर ट्रीट ला जाऊन आली. पहिल्या १० चॉकलेटनंतर त्याचा विश्वास बसत नव्हता की त्याला इतके चॉकलेट्स मिळाले आहे. त्याचे हावभाव बघून खरंच मजा वाटत होती. अजून दोनेक तासात त्याची आक्खी बकेट भरली आणि सर्व चॉकलेट्स घरी आले. दरवर्षी ते सर्व ठेवून टाकणे आणि त्याची विल्हेवाट लावणे मोठं कष्टाचं काम असतं. थोडे एका पिशवीत घालून बाहेर काढून ठेवले होते. त्यातलेच मग कधी हट्ट केला तर द्यायचे असे चालू आहे. आणि कधी कधी खूप छान वाटते जेव्हा ती पिशवी समोर असूनही काढून आणून स्वनिक आम्हाला विचारतो की 'मी हे खाऊ का?' .
आजकाल मुलांना गोळ्या, बिस्किटे, चिप्स हे इतक्या सहजपणे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसते की साधे किराणा आणायला गेल्यावरही एकतर त्यांची रडारड होते किंवा आम्हाला समोर दिसणारे चॉकलेट किंवा बिस्कीट घ्यावे तरी लागते. सुदैवाने मुले बरेचवेळा ऐकतात. पण प्रत्येकवेळी शक्य होत नाही. आणि जसे जसे ते मोठे होत आहेत, त्यांना समजावणे किंवा नकार देणे अवघड जात आहे. त्यात शाळेत मुलांच्या डब्यात कधी कधी अगदीच 'जंक फूड' येते, तेव्हा 'मला का ते मिळत नाही?' यावर उत्तर देणे अवघड जातेय. एक-दोन वेळा आम्ही स्वनिकला मग डब्यात जेवणासोबत चिप्सही दिले होते. बरं, पुढे जाऊन याच सर्व गोष्टी वाढदिवसालाही मिळतात. चिप्स, चॉकलेट हे प्रत्येक पार्टीत असतेच. त्यातून बाहेर पडणे अजूनच अवघड जातेय.
घरी असताना बरेचदा त्यांना जे खातोय ते योग्य का आहे हे समजावून सांगतो. इतके की एक-दोन वेळा मी काहीतरी विसरले असताना स्वनिकने मला 'बदाम खाण्याचा' सल्ला दिला. :) सुदैवाने त्यांना सलाड आणि फळे खूप आवडते. तरीही मी केलेल्या भाज्या, वरण, चपाती खाणे अगदी तिखट जेवणही करणे यात थोडे वाद होतात. पण त्यांना आता वेगवेगळे सूप, सलाड, भाज्या आवडत आहेत. कधी सान्वी डाळ भाताची खिचडी करायला सांगते किंवा स्वनिक भेंडीची भाजी. अशावेळी आपण जे त्यांना शिकवत आहोत त्याचा खूप आनंद होतो. पण त्यासाठी तितकाच पेशन्स ठेवावा लागतो.
परवाच मी डब्यात दिलेला चपातीचा रोल तसाच परत आला. त्यात सान्वीनेही पावभाजी खायला नाटक केले. हे सर्व इतके वैतागवाणे होते की चिडचिड झाली खूप. डब्यात दिलेले बरेचसे जेवण तसेच परत आल्यावर किती आणि काय समजवायचे असा प्रश्न पडतो. कधी ते मोठे होतील आणि स्वतःची काळजी घेतील या विचार वैताग येतो. काळ मात्र मला एक मोठा आनंदाचा धक्का मिळाला. डबा पूर्ण संपलेला होता. म्हटले काय विशेष आज? स्वनिकने शाळेत माझ्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवले होते. कार्ड मध्ये लिहिले होते, "Aai tu best cook aahe". :) तेही त्याने मराठी मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटले मी केलेला पास्ता आवडतो म्हणून त्याने लिहिलेय कि काय? तर म्हणे,"तू परवा केलेलं वरण खूप छान झालं होतं म्हणून मी हे ग्रीटिंग केलं तुझ्यासाठी".
आता एक आई म्हणून मला झालेला आनंद तर होताच. पण अनेकदा त्यांच्या न खाल्लेल्या डब्याकडे पाहून होणारी चिडचिड, त्यांना अनेक भारतीय पदार्थातील असलेला आनंद ना समजणं, चॉकलेट-चिप्स, जंक फूड पासून वाचवण्यासाठी कष्ट घेणे इ यावरून खूप दमायला होते. पुढे जाऊन कधी त्यांना आपल्या जेवणाची किंमत राहील का असे वाटतेही. त्यात कधी कधी हे असे क्षण मात्र एक नवीन आशा नक्कीच देतात, पुढेही योग्य ते करत राहण्याची. :) त्यांना योग्य-अयोग्य शिकवण्यासाठी कितीही ट्रिक्स वापराव्या लागल्या तरी चालेल हे अशी ट्रीट मिळणार असेल तर. होय ना?
विद्या भुतकर.

No comments:
Post a Comment