सपनाला रात्री एक मेसेज आला होता,"काय करताय?". तिला नंबर ओळखीचा वाटेना. एकदम तिच्या लक्षात आलं आणि तिनं पर्समधून कार्ड शोधून पाहिलं तर मनोजचा नंबर होता तो. ती वैतागली.
"हे बघ, हा मागेच लागलाय. काय करायचं?", सपनाने आईला फोनवरचा मेसेज दाखवला.
बाईंनी गेलेकाही दिवस विचार केला होता. जर मुलगा स्वतः भेटायचं म्हणत आहे आणि त्याचे आई वडील काही बोलत नाहीयेत तर आपण का बोलायचं?
"हे बघ सपने, तुला नक्की काय पायजे ते ठरव. तुला नुसतं एकदा बगून लग्न ठरवलेलं पण नकोय. पोरगा चांगला हाये, बघण्यातला हाये, घरचे लोक ओळखीचेत. नोकरी, घरचं चांगलंच हाये. तुला काय बोलून घायचंय ते बोल ना. निदान दोन चारदा भेटलीस तर वोळख तर वाढलं. तू म्हंलीस तर त्यांना सांगून टाकू थेट बघायला या, तेव्हा काय ते बोलू म्हणून. ", बाईंनी एकदाचं सांगून टाकलं.
सपना विचार करायला लागली. तिची आवडती सिरीयल संपून गेली होती आणि कुठलातरी 'लिट्ट्ल चॅम्पियन' कार्यक्रम सुरु झाला होता. मुलांना असं गोड गाताना बघून मजा यायची तिला. आता त्यातली स्पर्धा एकदम शेवटच्या टप्प्याला आली होती. ती बघत असतानाच परत मेसेज आला,"J1 झालं का?".
तिने शेवटी उत्तर दिलं,"हो, TV बघतेय. बाय".
परत फोन वाजला,"हो का? मी लिट्ट्ल चॅम्प्स बघतोय."
तिने उत्तर दिलं,"मी पण".
परत मेसेज आला,"वा वा. उद्या भेटायचं का? मी येतो तिकडं दुपारी?".
सपनाने विचार केला आणि 'ओके' म्हणून उत्तर दिलं. कार्यक्रम चालू असतानाच सपनानं समोर ताट घेऊन जेवण करुन घेतलं आणि अभ्यासाला लागली. पुस्तक डोळ्यासमोर होतं तरीही ती अजून मनोजचाच विचार करत होती. दिसायला बरा होता. कपडे एकदम नीटनेटके घातले होते त्याने. त्याचं असं उगाच बोलणं तिला खटकत होतं पण आईचं बोलणंही पटलं होतं. एकदा बघून लग्न ठरवण्यापेक्षा हे असं भेटलेलं बरं. विचार करत असतानाच परत तिला एक मेसेज आला, "गुड नाईट". तिनेही त्याला 'गुड नाईट' म्हणून उत्तर दिलं.
-------
दुसऱ्या दिवशी सकाळी क्लासमध्ये असताना तिला मेसेज आला होता,"दुपारी ४ला भेटायचं का कॉलेजच्या बाहेर?".
तिने उत्तर दिलं,"ओके".

"रजतारा मध्ये या.", त्याचं उत्तर आलं होतं.
------
सपनाने दुपारी वैशीला सांगितलं की मनोजला भेटायचं आहे. वैशीने तिला विचारलंही, "मी थांबू का?".
"नाही नको, मी भेटते त्याला एकटी. साडेपाचच्या बसनं येईन मी. तू उगाच माझ्यासाठी नको थांबूस."
सपना दुपारी चार वाजता ठरलेल्या हॉटेलच्या जवळ पोचली.
इतक्यात मनोजचा फोन आला,"हां कुठाय? मी पोचलो इथं."
सपनाने त्याला दुरुन पाहिलं होतं. ती चालत त्याच्याजवळ पोहोचली. दुपारी मनोजला बाईकवरुन उतरताना पाहून तिला जाणवलं की सकाळी बसमधून कॉलेजला येऊन दुपारपर्यंत अवतार एकदम वाईट झालेला असतो. आज काय कपडे घालायचे असा काही खास विचार केला नव्हता. तिने साधं तोंडही धुतलं नव्हतं. आजपर्यंत आपण कसे दिसतो यावर विशेष विचार करायची वेळच आली नव्हती. मनोज गाडीवरुन उतरला, डोळ्यांवरचा गॉगल काढला. आज थोडा वेगळा वाटत होता. गेले दोन वेळा भेटला तेंव्हा फॉर्मल शर्ट पॅन्ट, शूज, असा शिक्षकी रुबाब होता. आज थोडा निवांत वाटत होता. निम्म्या बाह्यांचा सफेद टीशर्ट, निळी जीन्स, स्पोर्टचे शूज, हातात घातलेलं टायटनचं घड्याळ आणि चेहऱ्यावर हसू.
तिने सर्वात आधीच सांगितलं,"मला जास्त वेळ थांबता नाही येणार. साडेपाचच्या बसने जायचं आहे. "
मनोज,"बस कशाला मी सोडतो की बाईकवरुन."
सपना,"नाही नको उगाच गावात चर्चा नको. मी बसनेच जाईन."
त्यालाही ते पटलं. ती त्याच्यासोबत आत गेली. हॉटेलच्या एका कोपऱ्यातल्या बेंचवर ते दोघेही बसले,समोरासमोर.
त्याने तिला सांगून वेटरकडे ऑर्डर दिली,"एक डोसा, एक सुकी भेळ,एक सरबत, एक चहा."
सपनालाही जाम भूक लागली होती. हॉटेल कुठलंही असो, तिला तिथे भेळच हवी असायची, तीही सुकी. त्यात उन्हाळ्याचं सरबत.
ऑर्डर देऊन मनोज बोलू लागला,"कसा चाललाय अभ्यास? काही अडलं तर सांगा. तसं जमतं मलाही थोडं थोडं. "
तो असं बोलल्यावर तिच्या लक्षात आलं की अरे खरंच, इतका शिकला आहे तर निदान आपल्याला काही अडलं तर सांगेल तरी. त्याच्या शिक्षणापर्यंत ती अजून पोहोचलीच नव्हती.
ती "हो" म्हणाली. "बाकी थेरीला इतका त्रास नाही, प्रॅक्टिकल चंच जरा टेन्शन येतं. आणि केमिस्ट्री. "
मनोज,"केमिस्ट्री? अरे, मग तर एकदम बरोबर माणसाशी बोलताय तुम्ही. ऑरगॅनिक केमिस्ट्री एकदम आवडता विषय आपला. कधी पण काय पण विचारा."
सपना त्याचा आत्मविश्वास बघून हसली आणि मानेनेच 'हो' म्हणाली .
त्याने पुढे विचारलं,"तुम्ही पण ते लिट्ल चॅम्प्स बघता का?".
सपना,"हो मला आवडतं ते."
मनोज एकदम खूष झाला आणि म्हणाला,"हो ना मला पण. कसली गातात पोरं एकेक. आणि इतका स्टेज डेरींग या वयात!".
तिला पण नेमकं हेच वाटायचं त्यामुळे त्याने असं बोलल्यावर तिला एकदम आवडलं ते.
"हो ना? कसले एकेक आहेत. आणि त्यांना काही भीती नाही, एकदम कॉन्फिडन्सने म्हणतात गाणी. मला तर ऐकायला, बघायला खूप आवडतं. ती छोटी मुलगी आहे ना 'आर्या' नावाची, तीच जिंकणार आहे बघा. ", सपना उत्साहाच्या भरात बोलली.
"ह्या, तो मुलगा येईल जिंकून. त्याचं नाव काय बरं?", मनोज विचार करु लागला.
"अर्णव?",सपनाने विचारलं.
"हां तोच तो. एकदम भारी आवाज आहे त्याचा. सगळ्या प्रकारची गाणी गातो तो. गुरुजींनी त्याला किती वेळा १० पैकी १० दिलेत. ",मनोज म्हणाला.
"नाही नाही, मी सांगते आर्याच येणार. ",सपना ठामपणे म्हणाली.
"पैज लावता का?", त्याने विचारलं.
"तर तर पैज आपली. हारलो तर इथंच पार्टी दीन मी. ",सपनाने सांगितलं.
"बरं, आणि ती आली तर मी दीन पार्टी, इथंच.", मनोजने सांगितलं.
इतक्यात भेळ आणि डोसा आला. सपनाने खायला सुरुवात केली.
त्याने सिंक जवळ जाऊन हात धुतला, रुमालाने पुसला आणि डोसा हाताने खायला सुरुवात केली.
लवकरच खायचं संपवून सरबत घेऊ लागली आणि मनोज चहा.
"मला चहा लागतो दिवसाला सारखा. ते शाळेत येतो ना दुपारी, टिचर रुममधे. सवयच लागलीय त्याची. आता दुपारी चहा नसला की कसंतरी होतं. ",मनोजनं सांगितलं. ती फक्त ऐकत होती आणि तो बोलत होता.
सरबत संपलं आणि सपनाने घड्याळाकडे पाहिलं. सव्वापाचला घाईघाईने ती उठली. मनोजने बिल दिलं आणि तिला म्हणाला,"घरी नाही सोडत, निदान स्टॉपवर तरी सोडतो आता. किती वेळ चालणार?".
तिने नाईलाजाने स्विकारलं. ती पोचली आणि लगेचच बस मिळाली. आज बसायला जागाही होती. आज वैशूही नव्हती सोबत त्यामुळे गाडी रस्त्याला लागल्यावर तिच्या विचारांनाही चालना मिळाली. मनोजबरोबर झालेल्या एकूणच संवादाचा विचार पुन्हा सुरु झाला होता. ती त्याच्या एका जोकवरुन हसली आणि एकदम तिला संत्या तर नाही ना आसपास याची जाणीव झाली. तिने पटकन गाडीत पाहिलं. तिला ओळखीचं कुणीही दिसलं नाही. तिला हुश्श वाटलं. गाडी गावात पोचली तेव्हा अंधार पडला होता. घरी पोहोचली इतक्यात फोन वाजला.
"पोचला का?", मनोजचा मेसेज आलेला होता.
"हो, आताच",तिनेही लगेच उत्तर दिलं आणि पायातून चप्पल काढली.
मोरीत जाऊन तोंड-हातपाय धुतले आणि घाईघाईने ताटं घेतली. स्वयंपाक तयार होता. तिची आवडती सिरीयल लागली होती,"कळले नाही तुला, कळले नाही मला". तो भाग संपला आणि लिट्ल चॅम्प्सची जाहिरात लागली.
तिला मनोजची आठवण झाली, 'तोही बघत असणार'. तिने पटकन ताट आत ठेवलं आणि कार्यक्रम बघायला येऊन बसली. आजचा कार्यक्रम चांगला झाला होता. तिच्या आवडत्या आणि त्याच्या आवडत्या मुला-मुलीला सारखेच मार्क मिळाले होते. त्यांच्यातली स्पर्धा जणू या आपल्यातच चालू आहे असंच वाटलं सपनाला.
झोपताना त्याचा मेसेज आला होता,"गुड नाईट".
तिने त्याला उत्तरात,"गुड नाईट" सोबत एक स्मायलीही पाठवला होता.
-------
-------
संध्याकाळी संत्या आणि बाकी मित्र असाच काहीतरी वेळ घालवत पार्टी ऑफिसमध्ये बसले होते. कॉम्प्युटरवर जोरात गाणी चालू होती. बाहेर सकाळी नाश्त्याला आणलेल्या प्लेट, पेले तसेच पडले होते. दोन तीन जण फोनवर काहीतरी बघून खिदळत होते. आता पार्टी ऑफिस त्यांचा नवा अड्डा झाला होता.
बन्या रोज सकाळी येऊन विचारुन जायचा,"काही काम आहे का?".
संत्या रोज एकच उत्तर द्यायचा,"पप्पाना विचारुन सांगतो".
बन्या रोज सकाळी येऊन विचारुन जायचा,"काही काम आहे का?".
संत्या रोज एकच उत्तर द्यायचा,"पप्पाना विचारुन सांगतो".
आज स्वतः पाटीलच आले होते. ते आले तसे बाहेरची पोरं एकदम शांत झाली. त्यांनी सगळ्या कचऱ्यावर नजर टाकली आणि संत्याच्या केबिनमध्ये गेले. त्यांना बघून संत्या, विक्या, अम्या उभे राहिले.
"काय चाललंय?", त्यांनी जोरात ओरडून विचारलं.
"ते मोर्चाची तयारी", संत्या गडबडला. त्याने कानांवर पडलं होतं त्यातून एक थाप मारली.
"कसला मोर्चा? अजून महिनाभर आहे त्याला", पाटील बोलले.
"तुम्हाला इथे हे काम करायला ऑफिस थाटून दिलंय का?", पार्टीची काय म्हायती वाचलीत आजवर?", त्यांनी विचारलं.
संत्या गप्प उभा राहिला.
"पार्टीचे नियम, नेते, त्यांची म्हायती, वाचली? आपल्या गावांत काय त्रास हाय लोकांना याची चौकशी केलीत? महिना हून गेला. हे काय चाललंय?", पाटलांचा आवाज वाढला होता.
सगळे शांत झाले होते.
"रात्री घरी लौकर या, बोलायचंय. अन हे ऑफिस म्हंजे काय कचराकुंडी हाय का? साफ ठेवा जरा, कळलं का? ", असं सांगून पाटील रागाने निघून गेले.
संत्यानं कंप्युटर बंद केला. केबिनमधला पसारा आवरायला घेतला. बाहेरच्या पोरांनी केलेला कचरा आवरला आणि ते निघून गेले. विक्या, अम्याही लवकरच बाहेर पडले.
- क्रमशः
विद्या भुतकर.
- क्रमशः
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment