रोज सकाळी मुलांना घाईने उठवते. कधी ऎकतात, कधी चिडचिड, रडारड. सूचनांचा भडीमार सुरु होतो. ब्रश कर, कपडे घाल, दुध पी, शूज घाल, ज्याकेट घाल, डबा घेतला का, बाहेर पड, चढ पटकन, उतर, आवर, बाय बाय.
घरी आल्यावरही, टीव्ही बंद कर, अभ्यास कर, जेवण नीट कर, पसारा आवर. बाहेर खेळायला गेल्यावर, हे करू नको, इथे जाऊ नको, थंडी आहे, पाऊस आहे, ऊन आहे. हॉटेल मध्ये जेवायला नको, घरी चल, झोपेची वेळ झाली, किती त्या सुचना.
विचार करतेय, त्यानाही कधी कळेल का? आपली आईही, हसणारी, फिरायला, बाहेर खायला, नियम तोडायला, अभ्यास बुडवायला, उशिरा पोचायला, झोपायला, टीव्ही बघायला आणि सर्व काही करायला आवडणारी व्यक्ती होती?
-विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

2 comments:
खुप छान...
Thank you. :) Tofique.
Post a Comment