गेल्या काही दिवसांपासून एक उपक्रम चालू आहे. तसा थोडा उशीरच झाला इथे सांगायला. पण या पेजवर येणाऱ्या अनेक वाचकांना कदाचित हेही आवडेल म्हणून इथे लिंक देत आहे. तर ही आहे 'न लिहिलेली पत्रे' या पेजवरील माझी नवीन पत्रमालिका. नाव आहे 'प्रेमपरीक्षा'. कुणाला तरी हाताने पत्र लिहून अनेक वर्षं झाली. या पेजवरील अनेक पत्रमालिका वाचून मलाही तो मोह टाळता आला नाही. पत्रं हे असं माध्यम आहे जिथे मनातले अनेक विचार सहजपणे मांडता येतात. त्यातूनही एखादी कथा सांगण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे.
'न लिहिलेली पत्रे' या पेजवर दर आठवड्याला तीन पत्रे प्रसिद्ध होतील, सोमवार-बुधवार-शुक्रवार सकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार. तर जरूर वाचा, प्रेमपरीक्षा. इथे या आठवड्यात प्रसिद्ध झालेली पहिली दोन पत्रांच्या लिंक देत आहे. या पुढील पत्रे तुम्ही तिथेच वाचाल आणि आवडतील अशी अपेक्षा आहे. तुमच्या प्रतिक्रिया, कमेंट जरूर सांगा. :) बाकी माझ्या या पेजवरील पोस्ट्स नियमित चालू राहतीलच. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आणि प्रोत्साहनामुळेच मी नियमित लिहू शकत आहे. आणि निरनिराळे प्रयोगही करून पाहू शकत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार.
विद्या भुतकर.

No comments:
Post a Comment