ते दोघेही माझाच अंश, म्हणजे तसा त्याच्याही.पण तरीही जन्म व्हायच्या आधीपासूनच एक खेळ सुरु होतो.
'ए तुझ्यासारखं नाक नको बरंका. '
'माझ्यासारखी उंची नको.'
'तुझ्यावर नको जायला स्वभावाने, चिडखोर कुठला.'
अगदी डोहाळे जेवणापासून ते जन्मापर्यंत नुसत्या गप्पा त्यावर. जन्म झाल्यावर तर मग काय, बाकी बाहेरचे लोकंही सुरु होतात.
'आईसारखा दिसतो, नै?'
'छे गं, कपाळ बघ बाबासारखा आहे अगदी.'
'अरे तू झालास ना तेव्हां असाच दिसत होता. नाक म्हणजे दोन बिळं होती फक्त. '
'केस मात्र हिच्यासारखेच आहेत हां. जावळ तरी बघ कितीये ते.'
कितीतरी खुसपट त्या इतकुशा बाळामध्ये काढली जातात. आमची मुलं आता थोडी मोठी झाली तरीही सवय काही जात नाही. कितीतरी वेळा स्वनिक एखाद्या खेळण्यात डोकं घालून बसतो. ते कसं चालतं हे शोधतो. नाही कळलं तर आमचं डोकं खातो. कधीकधी वाटतं, 'अरे बास! किती चिवट आहे हा. सोडत नाही अजिबात'. पण मग त्याचा बाबा तरी काय वेगळा आहे? कधी पुस्तक घेऊन बसतो सकाळी, संध्याकाळी सतत. तर माझी आई म्हणाली,'आईवर गेलाय अगदी.'
अगदी खाण्याच्या आवडीही किती सारख्या असतात. आंबट खायची संदीपची हौस, ती मुलामध्ये दिसते. मी भात खाताना नेहमी तूप ताटात बाजूला घेऊन कणकण खाते. सानूही तशीच. संदीप माझ्याकडे बघून म्हणतो,'आईवर गेलीय. ' :) खोबरं, शेंगदाणे किंवा चिंचा असोत. कुणाला आवडत नाहीत? तरीही तो गुण आपल्याकडूनच आला आहे अशी खात्री असते. :)
पण आम्ही तिथेच थांबत नाही. सानू कधीकधी छान चित्र रंगवते. तिला फुलांची, झाडांची खूप आवडही आहे. नेहमी कुठे गेले की एखादे रोपटे, फुल घ्यायच्या मागे लागते. मग तेव्हा मला वाटते,'अगदी आजीवर गेलीय.'. आमच्या आईलाही अशीच सवय आणि आवड आहे. :) कधी एखाद्या नातवाला आजी म्हणते, 'मामावर गेलाय.', 'काकावर गेलाय.'
किती छोट्या गोष्टी पण आपल्याच त्या अंशात आपलीच छबी बघण्याची किती हौस असते न आपल्याला? आणि ती सापडली की मोठा शोध लावल्याचा आनंद होतो. अर्थात आपल्यातले वाईट गुणही आपल्याला माहित असतातच आणि त्यातले कुठलेही आपल्या मुलांत येऊ नये अशी खूप इच्छाही असते. पण खरं सांगा त्यातली एकतरी आपण कधी स्वत: मोठ्याने बोलून दाखवतो का? :) जाऊ दे, आत्ताच कुल्फीच्या काड्या मी आणि सानूने खाल्ल्या तिथेच टाकल्या म्हणून संदीपकडून ऐकून घेतलं आहे. :P
विद्या भुतकर.

No comments:
Post a Comment