काहीकाही गोष्टींची किती सवय असते, नाही का? त्यातली प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे पोरांची शाळा, अभ्यास आणि पालक म्हणून माझी मानसिकता. आजही कुणी मुलगा मुलगी रिझल्ट घेऊन आले की पहिला प्रश्न मनात येतो, 'कितवा नंबर आला? किती मार्क पडले?'. आता भारतातही शिक्षणव्यवस्था बरीच बदलली आहे म्हणे. मला कुणाला शैक्षिणिक क्षेत्रात जवळून पाहण्याची बरेच वर्ष संधी आली नाही. त्यामुळे सध्या काय चालू आहे याची काहीच कल्पना नाही. उलट त्यामुळे एक पालक म्हणून मी नेहमी काहीतरी महत्वाची गोष्ट विसरून जाईन अशी मला भीती वाटते. अगदी, 'अडमिशन घ्यायला रात्री जायचे होते आणि माझी झोप उघडलीच नाही', अशी स्वप्नंही पडली आहेत. तर एकूण काय मुलगी शाळेत जायला लागल्यापासून जरा थोडे काही पाहत आहे. असो.
सांवी चार वर्षाची असताना पुण्यात शाळेत जायला लागली. तिथे जरा जरा होमवर्क मिळू लागले. तिच्या वयाच्या मानाने ते मला जास्त वाटायचे त्यामुळे कधी कधी सोडूनही द्यायचे. शाळेत बरेच नियम होते जे शिकायला आम्हाला बराच वेळ लागला. त्यातला एक म्हणजे होमवर्क असलेलं पुस्तकच फक्त घरी येणार. ते चेक करायचं की कुठल्या पानावरचा अभ्यास आज घ्यायचा आहे. आणि पानेही ओळीने घेतली जातील असे नाहीच. त्यामुळे मागच्या आठवड्यात ५० वे पान केले असेल तर आज कदाचित १५ असेल. असो हळूहळू मला ते समजू लागलेहोते. तरीही अमेरिकतील पद्धत पहिली होती अभ्यास घ्यायची, त्यामुळे कधीकधी तिला ५० वेळा एकच अक्षर लिहायला सांगायची इच्छा व्हायची नाही माझी. कित्येक वेळा शाळेतून तिच्या बाईंची नोट पण आली, 'अर्धवट राहिलेली पाने पूर्ण करून घ्या' म्हणून.मी विचार करायचे जाऊ दे ना कधीतरी शिकेलच A B C D.
तरीही एक गोष्ट माझी चुकते ती म्हणजे आपले मुल बाकी मुलांच्या मागे पडत नाही ना हे जाणून घ्यायची इच्छा. सध्याच्या तिच्या शाळेत (अमेरीकेत) तिला रिपोर्ट कार्ड मिळते. त्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिची काय प्रगती आहे ते देतात. म्हणजे अगदी तिचे हस्ताक्षर कसे आहे, ती वर्गात बाकी मुलांसोबत कशी वागते, आर्ट मध्ये तिची प्रगती कशी आहे किंवा आजूबाजूच्या जगात काय चाललंय याची तिला किती कल्पना आहे. ती कुठलेही पुस्तक वाचले की त्यावर कसा विचार करते, इत्यादी. पण त्या रिपोर्ट कार्डमध्ये मार्क न देता, १-४ च्या नंबर लाईन वर ती कुठे आहे हे लिहिलेलं असतं. त्यावरून मला तिला कुठे सुधारणा करायची गरज आहे हे कळते. अगदी चार पानांचं असतं ते कार्ड. पण तरीही माझं समाधान होत नाही. एकतर इथे लोक इतके गोड बोलतात की ते खरंच चांगली गोष्ट सांगत आहे का सुधारणा केली पाहिजे हे सांगत आहेत हे कळत नाही. (तेही एक कारण असेल का माझं समाधान न होण्यासाठी? :) ) असो.
तसा विचार केला तर सध्याचे जे रिपोर्ट कार्ड आहे ते आधीपेक्षा कितीतरी बाकीची माहिती देतं. म्हणजे फक्त गणित, भाषा, इतिहास आणि विज्ञान या चार विषयांपेक्षा अजून बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. आणि तुमच्या मुलाच्या वयासाठी जे त्याला/तिला आलं पाहिजे त्यातलं किती येतं इतके समजले की बास. यापेक्षा अजून काय पाहिजे? पण माझं समाधान होत नाही. मला अजून काहीतरी हवं असतं. ती बाकी मुलांपेक्षा मागे तर पडत नाही हे जाणून घ्यावे वाटत राहते. आजपर्यंत केवळ, 'मार्क किती पडले' आणि 'कितवा नंबर आला' हे दोनच प्रश्न मला विचारले आहेत त्यामुळे असेल. आणि तेच प्रश्न माझ्याही मनात येतात, म्हणजे पहिली आली, दुसरी आली, ५० वि आली, इत्यादी.
केवळ वर्गात असलेल्या पन्नास मुलांसोबत तुलना न करता, व्यक्तीची स्वत:सोबत तुलना केली पाहिजे आणि पुढे त्याच्यात किती प्रगती होत आहे हे पाहिले पाहिजे. आणि तेच योग्य आहे हे मला कळतंय, पण वळत नाहीये. माझ्या या मानसिकतेमधून मला बाहेर पडायला हवे पण वेळ तर लागणारच आहे. सान्वी घरातलं पहिलंच मूल असल्याने सर्व प्रयोग तिच्यावरच होणार असं दिसतंय. मुलगा शाळेत जायला लागेपर्यंत थोडी सवय होऊन जाईल अशी अपेक्षा. :) आजच शाळेत बाईंना भेटून आल्यामुळे हे सर्व विचार. :) असो.

P. S. - इथल्या शिक्षिकेला बाई म्हणायला कसंतरीच वाटतं नाही? :)
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment