परवा थालीपीठ केली, भाजणीची. थालीपीठ भाजणीचंच करतात हे मलाही माहित आहे. पण इथे भाजणी बनवून किंवा विकत मिळत त्यामुळे अनेकवेळा मी गव्हाचं, डाळीचं, तांदळाचं पीठ एकत्र करुन थालीपिठासारखं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या चवीनं अजूनच चिडचिड झाली. तेव्हापासून दरवर्षी भारतातून येताना जमेल तितकं भाजणीचं पीठ घेऊन येते. त्यातच थोडी कणिक, डाळीचं पीठ घालून वाढवते आणि थालिपीठं करते. निरनिराळ्या डाळी, तांदूळ भाजून बनवलेल्या त्या पिठाचा जो सुंदर वास असतो तो आणि चव याचा आनंद वेगळाच. खरंतर आई पूर्वी तळूनच करायची थालीपीठ, सोबत घरचं सायीचं दही किंवा लोणी आणि ठेचा ! बस ! :) आता ती खाल्याला बरीच वर्षं झाली. असो.
तर काय सांगत होते? थालीपीठ बनवतांना वाटलं करोना असो किंवा नसो, हे पुरवून वस्तू वापरायची सवय जुनीच. मी शिकागोहून भारतात शिफ्ट होणार होते तेंव्हा आईने दोन महिने आधीच विचारायला सुरुवात केली होती कुठल्या डाळी, किती तांदूळ, गहू भरुन ठेवायचंय. बाकीच्या हजार गोष्टी असताना मला कळत नव्हतं की हे वर्षाचं सामान आता भरायची काय गरज आहे? पण आम्ही गेलो तोवर आईने सर्व घेऊन, ८ मोठाले डबेही घेऊन ठेवले होते. आजही ते भारतात पडून आहेत. डाळी, तांदूळ वगैरे वर्षभराचं भरुन ठेवायची इथे कधी सवय नाही. तरी घरात कुठलीही बारीक सारीक गोष्ट कधीही लागू शकते हे अनुभवानं कळलेलं होतं. विशेषतः मीठ, पीठ, मसाले, डाळीचं पीठ, उसळी वगैरे भरुन ठेवायची सवय लागली हळूहळू. शिवाय अनेक ठिकाणी भारतीय भाज्या, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे आणायला लांब जावं लागायचं. त्यामुळे तेही ३-४ आठवड्याचं आणून ठेवायची सवय झालीय. पण या सगळ्यांपेक्षा जास्त मोठा साठा म्हणजे भारतातून आणलेल्या वस्तूंचा.
दरवेळी भारतातून परततांना मोठं कामच ते. आवडीच्या वस्तूंची यादी बनवायची आणि त्या जमेल तितक्या घेऊन यायच्या इकडे आणि वर्षभर त्याच पुरवून वापरायच्या. त्यात हे भाजणीचं पीठही. दोंघाच्या आया फोनवर विचारुन ठरवणार की काय काय कोण कोण करतंय. भाजणी आईकडंची. ज्वारीचं पीठ कुणाला जमेल तसं. हळद, लाल तिखट हेही घरुनच आणलेलं. सासूबाईंच्या हातचं आंब्याचं, लिंबाचं गोड लोणचं. सासरे समोरच्या डेअरीमध्ये जाऊन त्यांच्या दुधाच्या पिशव्या घेऊन लोणच्याच्या पाकिटांना हवाबंद पॅक करुन आणून देणार. ती पाकिटं अजून दोनचार टेप लावून आवरणं घालून बॅगेत ठेवायची. सासरचे नाचणीचे पापड. आईने एकांकडून मशीनवर बनवून घेतलेल्या शेवया, बिया काढून मीठ लावून ठेवलेल्या घरच्या चिंचां आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरचा काळा मसाला. आता या सगळ्यात कधी कधी विकत आणलेल्या चटण्या, मेतकूट वगैरेही असतंच.

हे सगळं करताना तिथे घरच्या सर्वांची तारांबळ चालू असते अगदी आम्ही इकडे येईपर्यंत. इथे आलं की ते सर्व सामान नीट आलंय ना बघून, काढून नीट डब्यांमध्ये कधी फ्रिजमध्ये ठेवलेलं असतं. गेल्या काही दिवसांत जेव्हा घरात काय काय सामान आहे बघायला लागलो तेव्हा या सगळ्या सामानाची परत हलवाहलव झाली. त्यात लोणच्याची दोन पाकिटं एका डब्यात मिळाली. दोन वर्षं पुरेल इतकं तिखट आणि हळद आहे. भाकरीचं पीठ, भाजणीचं पीठ, चटण्या, लोणची, पापड, शेवया, सगळंच गरज लागली तर वापरता येईल याचं एक मानसिक समाधान आहे. हा आमचा साठा आहे आणि सगळ्यांचं प्रेमही. आज पुन्हा एकदा सर्वांच्या त्या धावपळीची , प्रेमाची आठवण झाली.
काल चवीत बदल म्हणून ही थालिपीठं झाली आणि सोबत नव्याने सापडलेलं लोणचंही. आता फक्त हे सर्व लवकर निपटलं म्हणजे परत पुढच्या वर्षीसाठी सामान आणायला जाता यावं म्हणजे झालं.
विद्या भुतकर.
1 comment:
Harrah's casino new jersey - GoGyoyoCafe
Harrah's casino new jersey - 스포츠벳 GoGyoyoCafe - is an online 졸리다 casino, game, gambling 감사 짤 and gambling website 포커 하는 법 operated 뱃365 by Harrah's Entertainment.
Post a Comment