Tuesday, June 12, 2007

आठवतं तुला..?

ती म्हणाली,
" आठवतं तुला...
त्या अनोळखी रस्त्यांवरून
तू माझ्याबरोबर यायचास
मदत म्हणून..
आज सारे रस्ते ओळखीचे झालेत
म्हणून तू अनोळखी व्हावं
असं थोडीच आहे?

मला रस्तेच हवे असते
तर कसेही शोधले असते
त्यासाठी कुणाच्या
ओळखीची गरज नव्हती
मला तुझी मदत नको,
सोबत हवी होती..."

तो उत्तरला,
"आठवतं तुला .....
तू दबकत चालत जायचीस
त्या रस्त्यावरच्या फुलांना
दुखवू नये म्हणून..
तुझा क्षणिक स्पर्शही
त्यांना पुरेसा झाला असता...
माझ्या प्रेमाचं सार्थक करण्यासाठी.

तुला कधी समजलंच नाही
ती मीच अंथरली होती...तुझ्यासाठी.
ज्या स्वप्नांना तू अस्पर्श सोडून गेलीस
आपली नाहीत समजून
तुला कधी उमजलंच नाही
ती फक्त तुझीच होती म्हणून...."
-विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज:

11 comments:

सारंग पतकी said...

वा!
कविता छान आहे!
मनातलं ओठांवर न आल्याने, किंवा न बोलताच सारं समजेल या आशेने काय घडत असावं हे थोडक्या शब्दांत पकडलंय!

लिहीत रहा...


सारंग

Sumedha said...

सही!

आज बर्‍याच दिवसानी बघतीये, सुंदर ब्लॉग!

Anonymous said...

Khasach!!!

Meghana Bhuskute said...

mastach. keep it up...

कोहम said...

bahot khub....subhanalla...

Samved said...

your understanding about my blog was really funny and could not control laughing!!! Thanks anyway.

Again I have a "mohim" to read all blogs this Sat as I was out of Pune for sometime...will post my thoughts on your blog..

Nandan said...

chhan aahe kavita.
आज सारे रस्ते ओळखीचे झालेत
म्हणून तू अनोळखी व्हावं
असं थोडीच आहे?
- visheSh aavaDale.

स्वाती आंबोळे said...

अर्रे वा! मस्तच.

Vidya Bhutkar said...

:-) आजकाल कविता लिहावीशी वाटणं कमीच झालंय आणि लिहिली तरी पोस्ट करावी की नको असाही प्रश्न असतोच. पण तुम्हा सर्वांच्या कमेंटमुळे मला खूपच आनंद झालाय आणि जरा जास्तच जोर चढलाय.:-)

आता, पुढच्या कविता वाचल्यावर पश्चाताप होऊ नये म्हणजे झालं. :-))

Anonymous said...

Was blog hopping and came across your blog.. I must say its very good! ani tumchya kavita, sahaj ani tarihi sundar ahet! Kudos!!

Unknown said...

खुप सुंदर....☺