Friday, June 15, 2007

तुझ्यासोबत

कधीतरी पहाटे
एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी,
आणि दचकून उठताना
तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी,
यासारखं सुख ते काय?

कधीतरी भांडताना
एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी,
आणि ती छॊटीशी जखम
दिवसभर छळत रहावी,
यासारखं दु:ख ते काय?

कधीतरी रविवारी
सगळं घर पसरलेलं,
आणि दुपार नुसतं पडून
आळसात घालवावी,
यासारखी मजा ती काय?

कधीतरी रडताना
तू एखादं वाक्य टाकावं,
आणि मी रडता रडता हसले
की पटकन कवेत घ्यावं,
यासारखा आधार तो काय?

कधीतरी लढताना
सगळे माझ्या विरुद्ध,
आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर
एका नजरेतंच समर्थन मिळावं,
यासारखं बळ ते काय?

कधीतरी चुकताना
मला तू वेळोवेळी बजावावं,
आणि तू सांगूनही मी चुकल्यावर
पुन्हा एकदा समजून सांगावं,
यासारखं प्रेम ते काय?

कधीतरी हसताना
तुझ्या डोळ्यांत पहावं,
आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं
सार्थक झालं असं वाटावं,
यासारखं समाधान ते काय?

कधीतरी जगताना
जुन्या आठवणींना जागवावं,
आणि जे हवं ते सर्व तू दिलंस
असं म्हणता यावं,
यासारखं आयुष्य ते काय?

-विद्या.

12 comments:

Anonymous said...

"कधीतरी जगताना
जुन्या आठवणींना जागवावं,
आणि जे हवं ते सर्व तू दिलंस
असं म्हणता यावं,
यासारखं आयुष्य ते काय?"
Chaan jamaliye kavita..

स्वाती आंबोळे said...

वा! सुंदर!

Shilpa Datar said...

surekh kavita

Unknown said...

kadhitari nivant vel milava wachaycha mood vhava ani,

ani asha mast kavita vachayla milavya t
ya sarkhe sukh ajun te kay asanar?


its really mindblowing !!

khupach sundar ahe.

raj

Vidya Bhutkar said...

अनॉनिमस, स्वाती, पंकज, राज तुमच्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
-विद्या.

Anonymous said...

kadhitari kavita lihitana,
evdhi sundar kalpana suchavi,
ani tich kalpana kaagdavar utarlyawar,
tevdhich sundar watavi,
yaasarkhe bhagya te kay?
kavya te kay?
kaushalya te kay?? :-)

ok ok...may b a pathetic attempt from me, but u keep writing poems ma'am!! ur poems rock!!

Anonymous said...

असं सगळं भरून येऊन
कवितेमधे उतरावं
असं कोणी जवळ असावं
यासारखं दैव ते काय

Vidya Bhutkar said...

साथीदारावरचं प्रेम मांडायला शब्दच अपुरे पडत होते. पण
"कधीतरी जगताना
जुन्या आठवणींना जागवावं,
आणि जे हवं ते सर्व तू दिलंस
असं म्हणता यावं,
यासारखं आयुष्य ते काय?"
या ओळी लिहिल्या आणि मनालाच खूप आनंद झाला. तुमच्या सर्वांच्याच प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. विशेषत: आपल्याही चार ओळी इथे मांडल्याबद्दल, राज, अमृता आणि अनॉनिमस, अनेक आभार. :-)
-विद्या.

Anonymous said...

waaa kiti chhan jamali ahe kavita...apratim.

kavita vachatana pratyekala janvel ki hi kavita tyani swataha jagali ahe,anubhavali ahe,pan ti nemakya shabdat vyakt nahi karata yet...

Vidya mam tumhala he kam agadi nit jamale ahe....khupach sundar...

tumhi je sadhya saral shabdat mandale ahe te thet manala jaun bhidate.

Unknown said...

कधीतरी जगताना
जुन्या आठवणींना जागवावं,
iska jawab nahi..too good

जे हवं ते सर्व तू दिलंस
असं म्हणता यावं,
यासारखं आयुष्य ते काय?
iskabhi ....aur kya kahe!!!

Manisha said...

after going through your writings, feels that ur profession & ur thoughts r extremely two opposite sides of the sea. where at one side u & ur mind have to be very practical in ur profesion and u r very emotional at ur heart. I think this is the similarity within both of us.

Unknown said...

khupch chan ahet vidya tai tumchya sarv post ..... mla khup awdalya ajun kahi kavita astil tr plz post kara