Thursday, May 31, 2018

आई आणि ४-जी

आमची आई डेंजर आहे. :) आता हे असं म्हटलं तर ती म्हणेल म्हणजे काय? तर आज मी फेसबुकवर टाकलेल्या फोटोवर तिचा लाईक आला. म्हटलं ऑनलाईन दिसतेय तर लगेच व्हाट्स ऍप कॉल केला तिला. तिने तो घेतलाही. म्हटलं अगं मागे कसला आवाज येतोय? तर म्हणाली, शेगावला गेलो होतो आता परत येतोय. :) म्हणजे ही तिच्यासाठी घेतलेल्या टॅबलेट वर ४-जी सुरु करून फेसबुक बघत आहे. आता आहे की नाही डेंजर? २००४ मध्ये डेस्कटॉपवर इंटरनेट घेऊन वेबकॅम वर पाहण्यापासून आजवर तिने सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि वापरतेही. आम्ही सगळे भाऊ बहीण बाहेर भटकलो त्या त्या ठिकाणच्या टाइम झोन, फोन नंबर, आमचे मित्र मैत्रिणी आणि त्यासोबत लागणारं तंत्रज्ञान तिने इतक्या सहज स्विकारलं. त्यामानाने बदल स्वीकारायला आम्हालाच जास्त वेळ लागत असेल. आज एकदम तिच्याशी व्हाट्स ऍप कॉल वर बोलताना हे सर्व तीव्रतेनं जाणवलं. म्हणून म्हटलं जाहीर कौतुक करावं. :) त्यासाठी ही पोस्ट. :) आता ही पोस्टही ती गाडीतून प्रवास करतानाच वाचत असेल. :) 

विद्या. 

No comments: