Tuesday, September 26, 2006

आरंभशूर??होय, आरंभशूर! आजकाल मला वाटते मला जर दुसरे नाव देता आले तर ते म्हणजे आरंभशूर!आता या लिखाणाचीच गोष्ट घ्याना. मला लिहायला सुरुवात करून ५-६ दिवस झाले असतील. तुम्ही माझा पहिला ब्लोग वाचला असेल तर कळेल की मी किती उत्साही होते रोज काहीतरी लिहायला. मी पहिले २ दिवस तर धड स्वैपाक पण केला नाही. आणि आज मला वाटले खरेच लिहायची इच्छा आहे का? :-) आता उत्तर काय असेल याचा अंदाज आलाच असेल. असो. मी लिहायला सुरुवात केल्याने आजचा दिवस तरी मी माझा शब्द ठेवला आहे.
या माझ्या आजाराची कहाणी आजची नाही. याची सुरुवात खूप वर्षापूर्वी झालेली आहे. शाळेत असताना मी आईकडे हट्ट केला कई मला स्कोलरशिपची परीक्शा द्यायची आहे. आणि का तर, सर्व जण शाळा सुटल्या नंतर ज्यादा तासाला बसायचे. :-) फारतर आठवडा भर माझा अभ्यासाचा उत्साह टिकला असेल.नंतर बिचारी आई अभ्यास कर म्हणून मागे लागून दमली. त्यानंतर सायकल शिकताना पण असेच, शिकेपर्यंत पडुन-धड्पडून ,शाळा बुडवून शिकले. नंतर त्याचाही उत्साह राहिला नाही. अरे हो, carrom शिकतानाही वेगळी गोष्ट नव्हती. आई दादानी सर्व इच्छा कशा पूर्ण केल्या हे त्यांनाच माहीत.
माझा थोड्या दिवसांपूर्वीचा छंद म्हणजे चित्रकला. तसे मी ८-९ पेन्सिल स्केचेस काढली आणि बरीच चांगली आली.त्यासाठी मी नवीन वह्या,पेन्सिल, काही पुस्तके पण आणली. खरं सांगते ती काढताना मी खूप मन लावून काढली. प्रत्येकवेळी २ चित्रांमधे २ महीन्यांचे तरी अंतर असेल. हा ब्लोग सुरु झाल्यापासून तर सारे साहीत्य असेच पडून आहे. आज हे सर्व सांगताना मला अपराधी वाटत आहे आणि अजून एकदा अपूर्ण राहीलेल्या गोष्टी पूर्ण करण्याचा निश्चय करतेय. :-) आजच्यासाठी एवढेच. आणि हो..माझ्या चित्रकलेचा एक नमुना.... वरच्या चित्रात......!!

-विद्या.

No comments: